S M L

एन.डी.तिवारीच रोहित शेखरचे वडील

27 जुलैरोहित शेखरचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून ते काँग्रेसचे नेते एन डी तिवारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिवारींचे डीएनए रोहितच्या डीएनएशी जुळले आहे. तिवारी यांची पॅटर्निटी टेस्ट दिल्ली हायकोर्टाने जाहीर केली. हा रिपोर्ट गुप्त ठेवावा, अशी विनंती तिवारी यांनी कोर्टाकडे केली होती. पण, कोर्टाने त्यांची विनंती फेटाळून लावली आणि अखेर वयाच्या 88 व्या वर्षी बाबा होण्याचा योग जुळून आला. कोर्टाने तिवारींची याचिका फेटाळून लावत आज कार्यकरी मुख्य न्यायमुर्ती ए.के.सिकरी आणि न्यायमुर्ती राजीव सहाय यांनी निर्णय देत डीएनए रिपोर्ट सार्वजनिक केला जावा पण त्याची पत्र कोणालाही देता येणार नाही असंही स्पष्ट केलं. रोहित शेखर कित्येक वर्षांपासून तिवारींविरोधात कोर्टात केस लढत आहे. रोहित यांच्या म्हणण्यानूसार त्यांची आई उज्जवला शर्मा तिवारी यांचे संबंध होते. त्यामुळे तिवारीच माझे वडील आहे. खरं खोटं काय आहे याचा तपास लागण्यासाठी रोहित यांनी कोर्टाकडे दाद मागितली. आज जाहीर झालेल्या निकालानंतर आता काही नको कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया उज्जवला शर्मा यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2012 02:31 PM IST

एन.डी.तिवारीच रोहित शेखरचे वडील

27 जुलै

रोहित शेखरचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून ते काँग्रेसचे नेते एन डी तिवारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिवारींचे डीएनए रोहितच्या डीएनएशी जुळले आहे. तिवारी यांची पॅटर्निटी टेस्ट दिल्ली हायकोर्टाने जाहीर केली. हा रिपोर्ट गुप्त ठेवावा, अशी विनंती तिवारी यांनी कोर्टाकडे केली होती. पण, कोर्टाने त्यांची विनंती फेटाळून लावली आणि अखेर वयाच्या 88 व्या वर्षी बाबा होण्याचा योग जुळून आला. कोर्टाने तिवारींची याचिका फेटाळून लावत आज कार्यकरी मुख्य न्यायमुर्ती ए.के.सिकरी आणि न्यायमुर्ती राजीव सहाय यांनी निर्णय देत डीएनए रिपोर्ट सार्वजनिक केला जावा पण त्याची पत्र कोणालाही देता येणार नाही असंही स्पष्ट केलं. रोहित शेखर कित्येक वर्षांपासून तिवारींविरोधात कोर्टात केस लढत आहे. रोहित यांच्या म्हणण्यानूसार त्यांची आई उज्जवला शर्मा तिवारी यांचे संबंध होते. त्यामुळे तिवारीच माझे वडील आहे. खरं खोटं काय आहे याचा तपास लागण्यासाठी रोहित यांनी कोर्टाकडे दाद मागितली. आज जाहीर झालेल्या निकालानंतर आता काही नको कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया उज्जवला शर्मा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close