S M L

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चिमुरड्याचा मृत्यू

28 जुलैगोंदिया मध्ये शुक्रवारी बांधकाम विभाग आणि पटेल सुपर कंस्ट्रक्शन सन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दुर्गेश बिसेन या तीन वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. दुर्गेश बिसेन हा खेळत असताना त्याचा उड्डाणपुलाच्या खड्‌ड्यात पडून मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने तीन वर्षांपूर्वी पटेल सुपर कंस्ट्रक्शन सन कंपनीला या उड्डाणपुलाचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं होतं. मात्र मागील तीन वर्षांपासून या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नाही. या पुलाच्या बांधकामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्‌ड्यात पडून दुर्गेश बिसेन या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दुर्गेशच्या नातेवाईकांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2012 08:17 AM IST

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चिमुरड्याचा मृत्यू

28 जुलै

गोंदिया मध्ये शुक्रवारी बांधकाम विभाग आणि पटेल सुपर कंस्ट्रक्शन सन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दुर्गेश बिसेन या तीन वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. दुर्गेश बिसेन हा खेळत असताना त्याचा उड्डाणपुलाच्या खड्‌ड्यात पडून मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने तीन वर्षांपूर्वी पटेल सुपर कंस्ट्रक्शन सन कंपनीला या उड्डाणपुलाचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं होतं. मात्र मागील तीन वर्षांपासून या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नाही. या पुलाच्या बांधकामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्‌ड्यात पडून दुर्गेश बिसेन या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दुर्गेशच्या नातेवाईकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2012 08:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close