S M L

'जंतरमंतर'वर 'दर्दी', अण्णा उद्या मैदानात

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली28 जुलैटीम अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अजूनही सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. पण जनतेनं मात्र आंदोलनाला आता चांगला पाठिंबा दिला आहे. उद्यापासून अण्णा स्वतः मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.टीम अण्णांच्या जंतरमंतर सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गेली काही दिवस तिथल्या गर्दीच्या मुद्यावरुन टीका करणार्‍यांची तोंड बंद झाली. अण्णांनी ज्या दर्दी लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली होती, ते सगळे दर्दी आज जंतरमंतरवर मोठ्याप्रमाणात दिसले. टीम अण्णांचे सदस्य असणार्‍या आणि डायबेटिस पेशंट असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. तब्येत जरी खालावली असली, आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत त्यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला. अण्णांनी हे आंदोलन सुरु होण्यापूर्वी सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ती तारीख उलटल्यामुळे रविवारपासून अण्णा स्वतः जंतरमंतरला बेमुदत उपोषणावर बसणार आहेत.दरम्यान, टीम अण्णाच्या समर्थकांनी पंतप्रधानांच्या घरासमोर निदर्शनं केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या 45 आंदोलकांना अटक केली. आता पेटत चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व रविवारपासून खुद्द अण्णा करणार आहेत. त्यामुळे सरकार कसा प्रतिसाद देतं, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2012 04:18 PM IST

'जंतरमंतर'वर 'दर्दी', अण्णा उद्या मैदानात

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली

28 जुलै

टीम अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अजूनही सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. पण जनतेनं मात्र आंदोलनाला आता चांगला पाठिंबा दिला आहे. उद्यापासून अण्णा स्वतः मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.टीम अण्णांच्या जंतरमंतर सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गेली काही दिवस तिथल्या गर्दीच्या मुद्यावरुन टीका करणार्‍यांची तोंड बंद झाली. अण्णांनी ज्या दर्दी लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली होती, ते सगळे दर्दी आज जंतरमंतरवर मोठ्याप्रमाणात दिसले. टीम अण्णांचे सदस्य असणार्‍या आणि डायबेटिस पेशंट असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. तब्येत जरी खालावली असली, आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत त्यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला. अण्णांनी हे आंदोलन सुरु होण्यापूर्वी सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ती तारीख उलटल्यामुळे रविवारपासून अण्णा स्वतः जंतरमंतरला बेमुदत उपोषणावर बसणार आहेत.

दरम्यान, टीम अण्णाच्या समर्थकांनी पंतप्रधानांच्या घरासमोर निदर्शनं केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या 45 आंदोलकांना अटक केली. आता पेटत चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व रविवारपासून खुद्द अण्णा करणार आहेत. त्यामुळे सरकार कसा प्रतिसाद देतं, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2012 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close