S M L

नाराजीनाट्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली हायकमांडची भेट

30 जुलैदिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या तणावाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीत तणावाचं नेमकं कारण काय आहे ? मुख्यमंत्र्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेमक्या अडचणी आहेत ? याबाबाबत मुख्यमंत्र्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना सविस्तर माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्याचबरोबर पक्षांतर्गत काय अडचणी आहेत याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर दिलंय. आमचे मुख्यमंत्री आणि मंत्री सार्वजनिक हिताचे काम करतात. व्यक्तीगत हितांच्या कामाला ते प्राधान्य देत नाहीत असा टोला माणिकरावांनी राष्ट्रवादीला लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 09:26 AM IST

नाराजीनाट्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतली हायकमांडची भेट

30 जुलै

दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या तणावाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीत तणावाचं नेमकं कारण काय आहे ? मुख्यमंत्र्यांबाबत राष्ट्रवादीच्या नेमक्या अडचणी आहेत ? याबाबाबत मुख्यमंत्र्यांनी सोनिया आणि राहुल गांधींना सविस्तर माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्याचबरोबर पक्षांतर्गत काय अडचणी आहेत याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर दिलंय. आमचे मुख्यमंत्री आणि मंत्री सार्वजनिक हिताचे काम करतात. व्यक्तीगत हितांच्या कामाला ते प्राधान्य देत नाहीत असा टोला माणिकरावांनी राष्ट्रवादीला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close