S M L

परभणीमध्ये एसटी बस पुलावरुन कोसळली,एक ठार

31 जुलैपरभणीमध्ये येलदरी नदीवरील पुलावरुन एक एसटी बस खाली कोसळून अपघात जालाय. या या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झाले आहेत. उटी या गावावरुन जिंतूरला येणारी ही बस 30 फूट उंचीवरुन नाल्यात कोसळली. नाल्यात जवळपास 6 फूट पाण्यात ही बस गेली. सकाळी 7 ला अचानक घडलेल्या अपघातानं आतील प्रवासी जखमी झाले यातील एकाच्या डोक्यास मार लागल्यानं तो जागीच ठार झाला.या बसचं समोरील टायर फुटल्यानं चालकाचा बसवरचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय. या भागातील स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदत केल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमी प्रवाशांना जिंतूर इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2012 10:11 AM IST

परभणीमध्ये एसटी बस पुलावरुन कोसळली,एक ठार

31 जुलै

परभणीमध्ये येलदरी नदीवरील पुलावरुन एक एसटी बस खाली कोसळून अपघात जालाय. या या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झाले आहेत. उटी या गावावरुन जिंतूरला येणारी ही बस 30 फूट उंचीवरुन नाल्यात कोसळली. नाल्यात जवळपास 6 फूट पाण्यात ही बस गेली. सकाळी 7 ला अचानक घडलेल्या अपघातानं आतील प्रवासी जखमी झाले यातील एकाच्या डोक्यास मार लागल्यानं तो जागीच ठार झाला.या बसचं समोरील टायर फुटल्यानं चालकाचा बसवरचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय. या भागातील स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदत केल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमी प्रवाशांना जिंतूर इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2012 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close