S M L

टीम अण्णांनी मागितली मीडियाची माफी

31 जुलैटीम अण्णांनी मीडियाची माफी मागितली आहे. काल काही अण्णासमर्थकांकडून मीडियावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशनने या घटनेसंदर्भात टीम अण्णांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज स्वत: अण्णा हजारेंनी मीडियाची माफी मागितली. एवढचं नव्हे तर त्यांनी हुज्जत घालणार्‍या समर्थकांना चांगलाच दम दिला. आंदोलनादरम्यान हिंसा झाली तर उपोषण मागे घेऊ असा सज्जड दमही त्यांनी आंदोलकांना दिला.आज टीम अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तर अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण याची सरकारनं कसलीही दखल घेतलेली नाही. टीम अण्णांच्या या आंदोलनाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतलीय. टीम अण्णासोबत कोणत्याही चर्चेची केंद्रसरकारची योजना नाही. अण्णांची प्रकृती ढासळल्यावर कुठे दाखल करायचं यावर कुठलाही निर्णय नाही. तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना सरकारी पध्दतीनुसार हॉस्पिटलमध्ये हलवणार येईल. पण अण्णांना उपोषण संपवण्याचं आवाहन सध्यातरी सरकार यावेळी करणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. केजरीवाल यांचं ब्लडप्रेशर 73 पर्यंत खाली आलंय तर गोपाल राय यांचं 63 पण ब्लजप्रेशर कमी झालंय. डॉक्टर्सनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय. पण केजरीवाल यांनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2012 10:21 AM IST

टीम अण्णांनी मागितली मीडियाची माफी

31 जुलै

टीम अण्णांनी मीडियाची माफी मागितली आहे. काल काही अण्णासमर्थकांकडून मीडियावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशनने या घटनेसंदर्भात टीम अण्णांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज स्वत: अण्णा हजारेंनी मीडियाची माफी मागितली. एवढचं नव्हे तर त्यांनी हुज्जत घालणार्‍या समर्थकांना चांगलाच दम दिला. आंदोलनादरम्यान हिंसा झाली तर उपोषण मागे घेऊ असा सज्जड दमही त्यांनी आंदोलकांना दिला.

आज टीम अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तर अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण याची सरकारनं कसलीही दखल घेतलेली नाही. टीम अण्णांच्या या आंदोलनाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतलीय. टीम अण्णासोबत कोणत्याही चर्चेची केंद्रसरकारची योजना नाही. अण्णांची प्रकृती ढासळल्यावर कुठे दाखल करायचं यावर कुठलाही निर्णय नाही. तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना सरकारी पध्दतीनुसार हॉस्पिटलमध्ये हलवणार येईल.

पण अण्णांना उपोषण संपवण्याचं आवाहन सध्यातरी सरकार यावेळी करणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. केजरीवाल यांचं ब्लडप्रेशर 73 पर्यंत खाली आलंय तर गोपाल राय यांचं 63 पण ब्लजप्रेशर कमी झालंय. डॉक्टर्सनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय. पण केजरीवाल यांनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close