S M L

ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं निधन

30 जुलैज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं आज सकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने सांगलीत निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. बाळ पळसुले काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर इचलकरंजी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र तब्येतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी दोन वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळ पळसुले यांनी जवळपास 150 मराठी सिनेमांनासंगीत दिलं होतं. भिंगरी, थापाड्या, फटाकडी, सासुरवाशीण पंढरीची वारी, नटले मी तुमच्यासाठी या सारख्या सिनेमांना संगीत दिलं.होतं. पळसुले यांना 2010मध्ये त्यांना दादासाहेब फाळके ऍकॅडमी पुरस्कारही मिळाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 08:28 AM IST

ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं निधन

30 जुलै

ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचं आज सकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने सांगलीत निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. बाळ पळसुले काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर इचलकरंजी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र तब्येतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी दोन वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळ पळसुले यांनी जवळपास 150 मराठी सिनेमांनासंगीत दिलं होतं. भिंगरी, थापाड्या, फटाकडी, सासुरवाशीण पंढरीची वारी, नटले मी तुमच्यासाठी या सारख्या सिनेमांना संगीत दिलं.होतं. पळसुले यांना 2010मध्ये त्यांना दादासाहेब फाळके ऍकॅडमी पुरस्कारही मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close