S M L

ऑलिम्पिकमध्ये फिक्सिंग ; 8 खेळाडूंना घरचा रस्ता

01 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकला आता वादाचं गालबोट लागलंय. बॅडमिंटनमध्ये फिक्सिंग झाल्याप्रकरणी 8 महिला खेळाडूंना स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशननं ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या या 8 महिला खेळाडूंवर जाणून बूजून खराब खेळ केल्याचा ठपका ठेवला होता. भारतीय बॅडमिंटन संघटनेनं या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात दक्षिण कोरियाच्या 2, चीनची 1 तर इंडोनिशियाच्या एका जोडीचा समावेश आहे. या चारही जोड्या डबल्सच्या क्वार्टरफायनलसाठी क्वालिफाय झाल्या होत्या आणि आपल्याला हवे तसे ड्रॉ मिळावेत म्हणून त्यांनी एकेक मॅच मुद्दाम हरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. चीनला क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध खेळायचं नव्हतं म्हणून चीननं हा सगळा प्रकार सुरु केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2012 12:55 PM IST

ऑलिम्पिकमध्ये फिक्सिंग ; 8 खेळाडूंना घरचा रस्ता

01 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकला आता वादाचं गालबोट लागलंय. बॅडमिंटनमध्ये फिक्सिंग झाल्याप्रकरणी 8 महिला खेळाडूंना स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशननं ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या या 8 महिला खेळाडूंवर जाणून बूजून खराब खेळ केल्याचा ठपका ठेवला होता. भारतीय बॅडमिंटन संघटनेनं या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात दक्षिण कोरियाच्या 2, चीनची 1 तर इंडोनिशियाच्या एका जोडीचा समावेश आहे. या चारही जोड्या डबल्सच्या क्वार्टरफायनलसाठी क्वालिफाय झाल्या होत्या आणि आपल्याला हवे तसे ड्रॉ मिळावेत म्हणून त्यांनी एकेक मॅच मुद्दाम हरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. चीनला क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध खेळायचं नव्हतं म्हणून चीननं हा सगळा प्रकार सुरु केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2012 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close