S M L

दुष्काळ निवारणासाठी राज्याला 1,367 कोटींची तातडीने मदत

01 ऑगस्टदुष्काळाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्रिगटाची बैठक आज पार पडली. या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 574 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय समितीसमोर मांडला होता. त्यातल्या 2 हजार 857 कोटींची तातडीची गरज असल्याचं सांगितलं. पण, या प्रस्तावात आणखी काही दुरुस्त्या सुचवून सुधारित प्रस्ताव करायला केंद्रीय समितीनं सांगितलं. आज केंद्रीय समितीने तीन बाबींसाठी पैसे मंजूर केले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 367 कोटी, राष्ट्रीय रोजगार हमीसाठी 500 कोटी, पाणलोट क्षेत्र विकासासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे राज्याला एकूण 1367 कोटी रुपये आज मंजूर झाले आहेत. यावेळी दुबार पेरणीसाठी सबसिडी देण्याचाही विचार केंद्र सरकार करेल, तसेच एक वर्षांत पूर्ण होणारे अपुरे प्रकल्प आणि दीर्घकालीन प्रकल्पांची यादी दिली तर त्यासाठी निधी देण्याचाही विचार केंद्र सरकार करेल, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं. राज्यातल्या 228 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगार हमी योजनेच्या कामांचे दिवस 100 वरून 150 करण्याचा निर्णय झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2012 01:10 PM IST

दुष्काळ निवारणासाठी राज्याला 1,367 कोटींची तातडीने मदत

01 ऑगस्ट

दुष्काळाच्या मुद्यावर केंद्रीय मंत्रिगटाची बैठक आज पार पडली. या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 574 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय समितीसमोर मांडला होता. त्यातल्या 2 हजार 857 कोटींची तातडीची गरज असल्याचं सांगितलं. पण, या प्रस्तावात आणखी काही दुरुस्त्या सुचवून सुधारित प्रस्ताव करायला केंद्रीय समितीनं सांगितलं. आज केंद्रीय समितीने तीन बाबींसाठी पैसे मंजूर केले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 367 कोटी, राष्ट्रीय रोजगार हमीसाठी 500 कोटी, पाणलोट क्षेत्र विकासासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे राज्याला एकूण 1367 कोटी रुपये आज मंजूर झाले आहेत. यावेळी दुबार पेरणीसाठी सबसिडी देण्याचाही विचार केंद्र सरकार करेल, तसेच एक वर्षांत पूर्ण होणारे अपुरे प्रकल्प आणि दीर्घकालीन प्रकल्पांची यादी दिली तर त्यासाठी निधी देण्याचाही विचार केंद्र सरकार करेल, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं. राज्यातल्या 228 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगार हमी योजनेच्या कामांचे दिवस 100 वरून 150 करण्याचा निर्णय झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close