S M L

पुणे स्फोटासाठी बुधवारी सकाळीच विकत घेतल्या सायकली

01 ऑगस्टपुण्यात झालेल्या 4 साखळी स्फोटात वापरण्यात आलेल्या सायकल बुधवारी सकाळी विकत घेण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. 3 अनोळखी व्यक्तींनी कसबा पेठेतल्या सोनी सायकल ट्रेडिंग कंपनीकडून या सायकल विकत घेतल्या. या कंपनीच्या मालकाने, या इसमांबाबत एटीएस आणि पुणे पोलिसांना माहिती दिलेली आहे. त्यांनी तिन्ही सायकलींना बास्केट लावण्याचा आग्रह केल्याची माहिती सायकल कंपनीच्या मालकाने दिली. या तिन्ही संशयितांची स्केच काढण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी दुकानातल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. स्फोटांच्या तपासासाठी पुणे पोलिसांबरोबरच NIA, NSG आणि ATSचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून आहेत. बॉम्बस्फोटांसाठी डिजिटल रिस्ट वॉच, 9 व्होल्टची बॅटरी, डिटोनेटर, बॉल बेअरिंग आणि एक पावडर सापडलीय. ही पावडर फॉरेसिंग लॅबकडे पाठवण्यात आलीय. स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याचीही पोलीस चौकशी करत आहेत. तो डेक्कन परिसरातल्या एका दुकानात टेलरिंगचं काम करतो. दुकानातून घरी परत जाताना तो एका ठिकाणी थांबला, परत जाताना त्याने चुकून दुसर्‍याची पिशवी उचलली. त्यात काय आहे हे पाहताना त्यात स्फोट झाल्याचं त्यानं सांगितलंय. त्याच्या पत्नीचीही चौकशी सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2012 01:37 PM IST

पुणे स्फोटासाठी बुधवारी सकाळीच विकत घेतल्या सायकली

01 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या 4 साखळी स्फोटात वापरण्यात आलेल्या सायकल बुधवारी सकाळी विकत घेण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. 3 अनोळखी व्यक्तींनी कसबा पेठेतल्या सोनी सायकल ट्रेडिंग कंपनीकडून या सायकल विकत घेतल्या. या कंपनीच्या मालकाने, या इसमांबाबत एटीएस आणि पुणे पोलिसांना माहिती दिलेली आहे. त्यांनी तिन्ही सायकलींना बास्केट लावण्याचा आग्रह केल्याची माहिती सायकल कंपनीच्या मालकाने दिली. या तिन्ही संशयितांची स्केच काढण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी दुकानातल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

स्फोटांच्या तपासासाठी पुणे पोलिसांबरोबरच NIA, NSG आणि ATSचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून आहेत. बॉम्बस्फोटांसाठी डिजिटल रिस्ट वॉच, 9 व्होल्टची बॅटरी, डिटोनेटर, बॉल बेअरिंग आणि एक पावडर सापडलीय. ही पावडर फॉरेसिंग लॅबकडे पाठवण्यात आलीय.

स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटील याचीही पोलीस चौकशी करत आहेत. तो डेक्कन परिसरातल्या एका दुकानात टेलरिंगचं काम करतो. दुकानातून घरी परत जाताना तो एका ठिकाणी थांबला, परत जाताना त्याने चुकून दुसर्‍याची पिशवी उचलली. त्यात काय आहे हे पाहताना त्यात स्फोट झाल्याचं त्यानं सांगितलंय. त्याच्या पत्नीचीही चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close