S M L

चक्क घरी सोडवत होते विद्यार्थी परिक्षेचा पेपर

03 ऑगस्टविद्यापीठ परिक्षेचे पेपर विद्यार्थी चक्क घरी सोडवत असल्याची घटना वर्ध्यात समोर आली आहे. वर्ध्याच्या अग्निहोत्री महाविद्यालयात हा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी 10 विद्यार्थ्यासोबत एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारे हे कॉलेज चालवण्यात येतं. गुरुवारी B- फार्म प्रथम वर्षाची परीक्षा होती मात्र परीक्षा केंद्रातील काही विद्यार्थी पेपर अर्धवट सोडून परत गेलेत. परिक्षेचा वेळ संपल्यानंतर 10 विद्यार्थ्यांनी आपले प्रश्नपत्रिका चक्क आपल्या घरी नेल्या आणि घरी बसून पेपर सोडवले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. आणि विद्यार्थ्यांना रंगेहाथ अटक केली. कॉलेजचा शिपाई पैसे घेवून हे काम करत असल्याच स्पष्ट झालंय. मात्र कॉलेजमधील बड्या धेंडाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, त्यामुऴे या प्रकरणात कॉलेजच्या व्यवस्थापकावर काय कारवाई होतो त्याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2012 10:14 AM IST

चक्क घरी सोडवत होते विद्यार्थी परिक्षेचा पेपर

03 ऑगस्ट

विद्यापीठ परिक्षेचे पेपर विद्यार्थी चक्क घरी सोडवत असल्याची घटना वर्ध्यात समोर आली आहे. वर्ध्याच्या अग्निहोत्री महाविद्यालयात हा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी 10 विद्यार्थ्यासोबत एका शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारे हे कॉलेज चालवण्यात येतं. गुरुवारी B- फार्म प्रथम वर्षाची परीक्षा होती मात्र परीक्षा केंद्रातील काही विद्यार्थी पेपर अर्धवट सोडून परत गेलेत. परिक्षेचा वेळ संपल्यानंतर 10 विद्यार्थ्यांनी आपले प्रश्नपत्रिका चक्क आपल्या घरी नेल्या आणि घरी बसून पेपर सोडवले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. आणि विद्यार्थ्यांना रंगेहाथ अटक केली. कॉलेजचा शिपाई पैसे घेवून हे काम करत असल्याच स्पष्ट झालंय. मात्र कॉलेजमधील बड्या धेंडाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, त्यामुऴे या प्रकरणात कॉलेजच्या व्यवस्थापकावर काय कारवाई होतो त्याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2012 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close