S M L

सायनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

02 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची एकेरीत विजयी घोडदौड सुरु आहे. पी कश्यपबरोबरच सायना नेहवालनंही क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसर्‍या फेरीत सायनाने नेदरलँडच्या जी यावोचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने 21-14 असा सहज जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने जी यावोवर 21-16 अशी मात केली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची क्वार्टर फायनल गाठणारी सायना नेहवाल ही भारताची पहिली महिला बॅडमिंटपटू ठरली आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सायनाची गाठ पडेल ती डेन्मार्कच्या बॉन टिनेशी. दरम्यान, बॅडमिंटनमध्ये क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा पी कश्यप सेमीफायनल गाठण्यासाठी प्रयत्न करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2012 02:38 PM IST

सायनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

02 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची एकेरीत विजयी घोडदौड सुरु आहे. पी कश्यपबरोबरच सायना नेहवालनंही क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दुसर्‍या फेरीत सायनाने नेदरलँडच्या जी यावोचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट सायनाने 21-14 असा सहज जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने जी यावोवर 21-16 अशी मात केली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची क्वार्टर फायनल गाठणारी सायना नेहवाल ही भारताची पहिली महिला बॅडमिंटपटू ठरली आहे. आता क्वार्टर फायनलमध्ये सायनाची गाठ पडेल ती डेन्मार्कच्या बॉन टिनेशी. दरम्यान, बॅडमिंटनमध्ये क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा पी कश्यप सेमीफायनल गाठण्यासाठी प्रयत्न करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2012 02:38 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close