S M L

एम.व्ही.अल्फा जहाजाला नौदलानं घेरलं

27 नोव्हेंबर, मुंबई' एम.व्ही.अल्फा ' जहाजानं कराचीमार्गे अतिरेकी मुंबईत आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे जहाज मुंबईहून गुजरातला जात असताना कोस्ट गार्डच्या जहाजांनी त्याला घेरलं. इंडियन नेव्हीच्या आयएनएस कुंजली आणि आयएनएस विंध्यगिरी या जहाजांनी ही कामगिरी केलीय. जहाजावरच्या कर्मचार्‍यांची चौकशी सुरू आहे.एम.व्ही. अल्फा हे या जहाजाचं नाव असून त्याची नोंदणी व्हिएतनामची असल्याचं कळतं. काही दिवसांपूर्वी हे जहाज मुंबईतील स्थानिक कोळ्यांना दिसलं होतं. या जहाजातून रबर बोटींच्या साहाय्यानं काही लोक मुंबईच्या किनार्‍यावर उतरल्याची माहिती त्यांनी स्थानिक पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी या माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत बोलताना नौदलाचे पीआरओ कॅप्टन मनोहर नांबियार यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं, एम.व्ही.अल्फा हे जहाज घेरलं असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. जहाजावर पनामाचा झेंडा आहे. कराचीनंतर ते मुंबईत आलं होतं. या जहाजातूनच अतिरेकी आले का, याबाबत चौकशी सुरू आहे '. या जहाजाद्वारे मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामागील महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2008 11:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2008 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close