S M L

सायनाचा 'गोल्डन'चान्स हुकला

03 ऑगस्टभारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. सेमीफायनलमध्ये तिला चीनची नंबर वन बॅडमिंटनपटू वँग यिहानकडून पराभूत व्हावं लागलंय. ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सेमीफायनलमध्ये प्रवेश करत सायनानं इतिहास रचला होता. ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यामुळे सेमीफायनलमध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण वँग यिहानच्या आक्रमक खेळासमोर सायनाचा निभाव लागला नाही. 21-13 आणि 21-13 असा सरळ सेटमध्ये तिला पराभव पत्करावा लागला. सायना नेहवाल आता शनिवारी ब्राँझ मेडलसाठी खेळणार आहे.जॉयदीप कर्माकर फायनलमध्येतर दुसरीकडे नेमबाजीत भारतासाठी एक चांगली बातमी आहे. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताच्या जॉयदीप कर्माकरनं चांगली कामगिरी केली आहे. 600 पैकी त्याला 595 पॉईंटची नोंद करता आली. पण अशी कामगिरी तब्बल 9 जणांनी केली. त्यामुळे आता फायनलसाठी जॉयदीपला शुटऑफमध्ये खेळावं लागणार आहे. शुटऑफमध्ये मोठा स्कोर केला तर तो फायनलसाठी पात्र ठरणार आहे.गगन नारंग फायनलमध्ये पोहचू शकला नाहीत्याचपाठोपाठ ब्राँझ मेडल विजेता गगन नारंग मात्र फायनलमध्ये पात्र ठरु शकला नाही. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात गगन नारंगकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला 18 व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. गगनला 600 पैकी 593 पॉईंटची नोंद करता आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2012 09:39 AM IST

सायनाचा 'गोल्डन'चान्स हुकला

03 ऑगस्ट

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. सेमीफायनलमध्ये तिला चीनची नंबर वन बॅडमिंटनपटू वँग यिहानकडून पराभूत व्हावं लागलंय. ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सेमीफायनलमध्ये प्रवेश करत सायनानं इतिहास रचला होता. ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यामुळे सेमीफायनलमध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण वँग यिहानच्या आक्रमक खेळासमोर सायनाचा निभाव लागला नाही. 21-13 आणि 21-13 असा सरळ सेटमध्ये तिला पराभव पत्करावा लागला. सायना नेहवाल आता शनिवारी ब्राँझ मेडलसाठी खेळणार आहे.

जॉयदीप कर्माकर फायनलमध्ये

तर दुसरीकडे नेमबाजीत भारतासाठी एक चांगली बातमी आहे. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारताच्या जॉयदीप कर्माकरनं चांगली कामगिरी केली आहे. 600 पैकी त्याला 595 पॉईंटची नोंद करता आली. पण अशी कामगिरी तब्बल 9 जणांनी केली. त्यामुळे आता फायनलसाठी जॉयदीपला शुटऑफमध्ये खेळावं लागणार आहे. शुटऑफमध्ये मोठा स्कोर केला तर तो फायनलसाठी पात्र ठरणार आहे.

गगन नारंग फायनलमध्ये पोहचू शकला नाही

त्याचपाठोपाठ ब्राँझ मेडल विजेता गगन नारंग मात्र फायनलमध्ये पात्र ठरु शकला नाही. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात गगन नारंगकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला 18 व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. गगनला 600 पैकी 593 पॉईंटची नोंद करता आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close