S M L

आईनंच रचलं चिमुकलीच्या अपहरणाचं नाटक

06 ऑगस्टमाझ्या 27 दिवसांच्या मुलीला हातातून हिसकावून पळवून नेले असं खोटं अपहरणाचं नाटक रंगवण्यार्‍या मातेनंच अवघ्या 27 दिवसांच्या चिमुकलीला ओढ्यात फेकून दिल्याची ह्रदयद्रावक घटना पुण्यात शनिवारी घडली. मुस्कान शेख असं या मातेचं नाव आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुस्कान शेख हिनं आपली 27 दिवसांच्या चिमुकलीला ओढ्यात फेकून दिलं. आणि नंतर केईएम हॉस्पिटलजवळून तिचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. 27 दिवसांच्या या मुलीला गंभीर आजार होता. यासाठी तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. तिच्या उपचारासाठी होणार्‍या खर्चांमुळे ही माता त्रस्त झाली होती त्यातून तिने हे कृत्य केलं. तिचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता त्यावरुन तिने हे नाट्य घडवले असल्याचे स्पष्ट झाल्याचं सहायक पोलीस अधिकारी एमएम मकायदार यांनी सांगितलं.पण, पोलिसांनी ही मुलगी अजून सापडलेली नाहीय. मुस्कान शेखनं मुलीचं नेमकं काय केलं, याचा तपास पोलीस करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 02:52 PM IST

आईनंच रचलं चिमुकलीच्या अपहरणाचं नाटक

06 ऑगस्ट

माझ्या 27 दिवसांच्या मुलीला हातातून हिसकावून पळवून नेले असं खोटं अपहरणाचं नाटक रंगवण्यार्‍या मातेनंच अवघ्या 27 दिवसांच्या चिमुकलीला ओढ्यात फेकून दिल्याची ह्रदयद्रावक घटना पुण्यात शनिवारी घडली. मुस्कान शेख असं या मातेचं नाव आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुस्कान शेख हिनं आपली 27 दिवसांच्या चिमुकलीला ओढ्यात फेकून दिलं. आणि नंतर केईएम हॉस्पिटलजवळून तिचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. 27 दिवसांच्या या मुलीला गंभीर आजार होता. यासाठी तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. तिच्या उपचारासाठी होणार्‍या खर्चांमुळे ही माता त्रस्त झाली होती त्यातून तिने हे कृत्य केलं. तिचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता त्यावरुन तिने हे नाट्य घडवले असल्याचे स्पष्ट झाल्याचं सहायक पोलीस अधिकारी एमएम मकायदार यांनी सांगितलं.पण, पोलिसांनी ही मुलगी अजून सापडलेली नाहीय. मुस्कान शेखनं मुलीचं नेमकं काय केलं, याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close