S M L

महासंचालकांना काढून घेतले पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार

06 ऑगस्टगृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातल्या इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्स्पेक्टर आणि पीएसआय या अधिकर्‍यांच्या बदल्यांचे अधिकार आता त्यांनी स्वतःकडे घेतले आहे. याबाबतचा जीआर 30 जुलै रोजी त्यांनी काढला आहे. या वर्ग-1, 2 आणि 3 दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार पोलीस महासंचालकांकडे होते. पण आता त्यांनी हे अधिकार आपल्याकडे घेतल्यानं पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पण, बदल्यांना गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता नसल्याने मॅटमधील काही निर्णय राज्य सरकारच्या विरोधात गेले, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणाबाबत आयबीएन लोकमतशी बोलतांना गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याबाबतचा जीआर सध्या थांबवण्यात आला आहे. याबद्दल एक नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत असल्याचं आबांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 04:21 PM IST

महासंचालकांना काढून घेतले पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार

06 ऑगस्ट

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातल्या इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्स्पेक्टर आणि पीएसआय या अधिकर्‍यांच्या बदल्यांचे अधिकार आता त्यांनी स्वतःकडे घेतले आहे. याबाबतचा जीआर 30 जुलै रोजी त्यांनी काढला आहे. या वर्ग-1, 2 आणि 3 दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार पोलीस महासंचालकांकडे होते. पण आता त्यांनी हे अधिकार आपल्याकडे घेतल्यानं पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पण, बदल्यांना गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता नसल्याने मॅटमधील काही निर्णय राज्य सरकारच्या विरोधात गेले, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणाबाबत आयबीएन लोकमतशी बोलतांना गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याबाबतचा जीआर सध्या थांबवण्यात आला आहे. याबद्दल एक नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेत असल्याचं आबांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close