S M L

पावसाची दडी, 6 तालुक्यांमध्ये पीकांना फटका

08 ऑगस्टराज्यात काही ठिकाणी पावसानं अजूनही दडी मारलेली आहे त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर आणि हवेली तालुक्यात पावसाने दडी मारल्यानं डाळिंब, सीताफळ, द्राक्ष या प्रमुख फळबागासहित ऊसाचे प्रमुख पीकही जळून गेलं आहे. हजारो जनावरांसाठी अद्यापही चारा डेपो चालू आहेत तर पिण्याच्या पाण्यासाठी या तालुक्यामध्ये टँकरचा वापर केला जात आहे. या भागातील ऊस हे पीक जळून गेले आहे. तर काही ठिकाणी जनावरांना चारा नसल्याने शेतकरी ऊस तोडून विकत आहेत. तर डाळिंब बागा पाऊस नसल्यामुळे बहरलेल्याच नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे तर शेतकरी जनावरांसाठी पाणी कुठून आणायचे याच्या विचारात आहे. तीन ते चार किलोमिटर वरुन पाणी आणण्याचा खर्च एका शेतकर्‍याला परवडत नसल्यामुळे एकत्रित पाईप लाईन टाकून शेतकरी पाणी मिळवत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2012 10:05 AM IST

08 ऑगस्ट

राज्यात काही ठिकाणी पावसानं अजूनही दडी मारलेली आहे त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर आणि हवेली तालुक्यात पावसाने दडी मारल्यानं डाळिंब, सीताफळ, द्राक्ष या प्रमुख फळबागासहित ऊसाचे प्रमुख पीकही जळून गेलं आहे. हजारो जनावरांसाठी अद्यापही चारा डेपो चालू आहेत तर पिण्याच्या पाण्यासाठी या तालुक्यामध्ये टँकरचा वापर केला जात आहे. या भागातील ऊस हे पीक जळून गेले आहे. तर काही ठिकाणी जनावरांना चारा नसल्याने शेतकरी ऊस तोडून विकत आहेत. तर डाळिंब बागा पाऊस नसल्यामुळे बहरलेल्याच नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे तर शेतकरी जनावरांसाठी पाणी कुठून आणायचे याच्या विचारात आहे. तीन ते चार किलोमिटर वरुन पाणी आणण्याचा खर्च एका शेतकर्‍याला परवडत नसल्यामुळे एकत्रित पाईप लाईन टाकून शेतकरी पाणी मिळवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close