S M L

हमीद अन्सारी दुसर्‍यांदा उपराष्ट्रपती

07 ऑगस्टउपराष्ट्रपतीपदी पुन्हा एकदा हमीद अन्सारी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जसवंत सिंग यांचा दारुण पराभव झाला आहे. हमीद अन्सारी यांनी 490 मतं मिळाली आहे तर जसवंत सिंग यांना 238 मतं मिळाली आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडले संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि तासाभरातच निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीच्या अगोदरपासूनच अन्सारी यांचे पारडं जड होतं. अन्सारी यांच्या उमेदवारीला सपा, जनता दल (सेक्युलर), डावे पक्षांनी पाठिंबा दिला होता. संख्याबळानूसार अन्सारी यांच्याकडे 451 मते होती तर निवडणूक येण्याकरीता केवळ 394 मतांची गरज होती. दुसरीकडे एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांच्याकडे 231 मतं आहेत. निकाल हाती आली तेव्हा अन्सारींनी गरजे इतक्या मतांपेक्षा अधिक मतं मिळवत विजयी झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 01:56 PM IST

हमीद अन्सारी दुसर्‍यांदा उपराष्ट्रपती

07 ऑगस्ट

उपराष्ट्रपतीपदी पुन्हा एकदा हमीद अन्सारी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जसवंत सिंग यांचा दारुण पराभव झाला आहे. हमीद अन्सारी यांनी 490 मतं मिळाली आहे तर जसवंत सिंग यांना 238 मतं मिळाली आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडले संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि तासाभरातच निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीच्या अगोदरपासूनच अन्सारी यांचे पारडं जड होतं. अन्सारी यांच्या उमेदवारीला सपा, जनता दल (सेक्युलर), डावे पक्षांनी पाठिंबा दिला होता. संख्याबळानूसार अन्सारी यांच्याकडे 451 मते होती तर निवडणूक येण्याकरीता केवळ 394 मतांची गरज होती. दुसरीकडे एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांच्याकडे 231 मतं आहेत. निकाल हाती आली तेव्हा अन्सारींनी गरजे इतक्या मतांपेक्षा अधिक मतं मिळवत विजयी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close