S M L

मीरा भाईंदरवासीय वार्‍यावर, पक्ष आले दारावर

विनय म्हात्रे, मिरा भाईंदर07 ऑगस्टयेत्या 12 ऑगस्टला मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक होतेय. झपाट्याने वाढत असलेल्या या शहराची लोकसंख्या 13 लाखाच्या वर पोहचली आहे. वाढत्या शहराप्रमाणे शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्यानं होणं अपेक्षित होतं. पण राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तींचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. मुंबई गुजरात हायवेला लागूनच वसलेल्या मिरा भाईंदर शहराकडे लोकांचा कल वाढला तो शहरातून जाणार्‍या पश्चिम रेल्वेमुळे. दळणवळणाची साधनं लोकांना मिळाली. पण शहरातल्या गटर, मिटर आणि वॉटर या साध्या सुविधांपासून ही लोकं वंचित आहेत. मिरा भाईंदर महापालिकेचं एक हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. महापालिकेनं मागील पाच वर्षात पाच मोठे प्रकल्प हाती घेतले होते. JNNURM च्या माध्यमातून 250 बसेस येणार होत्या. आता पर्यंत फक्त 50 बसेसच आल्या आहेत. शहरात 40 कोटी रुपयांचं सबवेचं काम अर्धवट आहे. 450 कोटी रुपये खर्चून सुरु असलेली भुयारी गटार योजनाही अपूर्णावस्थेत आहे. शहरातल्या डंपिंग ग्राऊन्डचा प्रकल्पही प्रलंबित आहे. 1300 कोटी रुपयांची अतिरिक्त पाणीपुरवठा योजनाही कागदावरच आहे. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, अपक्ष, आणि बसपा यांनी अपक्ष महापौर बसवून पहिले अडीच वर्ष संसार केला. तर उर्वरित अडीच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता उपभोगली. मिरा भाईंदर महापालिकेनं हाती घेतलेले सर्व प्रकल्पांची कामे सुरु आहेत. असा दावा काँग्रेसनं केला आहे.शहरातली परिवहन सेवा मृतावस्थेत आहे. शहरातील दहा वर्षांपूर्वीच्या जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा अनेक समस्यांनी मिरा भाईंदर मधील नागरीक त्रस्त आहेत. या निवडणुकांमध्ये देण्यात येणार्‍या आश्वासनांची पूर्तता तरी पूर्ण होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. अर्धवट प्रकल्प- JNNURM च्या माध्यमातून 250 बसेस येणार होत्या. आतापर्यंत फक्त 50 बसेसच आल्या आहेत. - शहरात 40 कोटी रुपयांचं सबवेचं काम अर्धवट आहे. - 450 कोटी रुपये खर्चून सुरु असलेली भुयारी गटार योजनाही अपूर्णावस्थेत आहे. - शहरातल्या डंपिंग ग्राऊन्डचा प्रकल्पही प्रलंबित आहे. -1300 कोटी रुपयांची अतिरिक्त पाणीपुरवठा योजनाही कागदावरच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 04:08 PM IST

मीरा भाईंदरवासीय वार्‍यावर, पक्ष आले दारावर

विनय म्हात्रे, मिरा भाईंदर

07 ऑगस्ट

येत्या 12 ऑगस्टला मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक होतेय. झपाट्याने वाढत असलेल्या या शहराची लोकसंख्या 13 लाखाच्या वर पोहचली आहे. वाढत्या शहराप्रमाणे शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्यानं होणं अपेक्षित होतं. पण राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तींचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

मुंबई गुजरात हायवेला लागूनच वसलेल्या मिरा भाईंदर शहराकडे लोकांचा कल वाढला तो शहरातून जाणार्‍या पश्चिम रेल्वेमुळे. दळणवळणाची साधनं लोकांना मिळाली. पण शहरातल्या गटर, मिटर आणि वॉटर या साध्या सुविधांपासून ही लोकं वंचित आहेत. मिरा भाईंदर महापालिकेचं एक हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. महापालिकेनं मागील पाच वर्षात पाच मोठे प्रकल्प हाती घेतले होते.

JNNURM च्या माध्यमातून 250 बसेस येणार होत्या. आता पर्यंत फक्त 50 बसेसच आल्या आहेत. शहरात 40 कोटी रुपयांचं सबवेचं काम अर्धवट आहे. 450 कोटी रुपये खर्चून सुरु असलेली भुयारी गटार योजनाही अपूर्णावस्थेत आहे. शहरातल्या डंपिंग ग्राऊन्डचा प्रकल्पही प्रलंबित आहे. 1300 कोटी रुपयांची अतिरिक्त पाणीपुरवठा योजनाही कागदावरच आहे. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, अपक्ष, आणि बसपा यांनी अपक्ष महापौर बसवून पहिले अडीच वर्ष संसार केला. तर उर्वरित अडीच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता उपभोगली. मिरा भाईंदर महापालिकेनं हाती घेतलेले सर्व प्रकल्पांची कामे सुरु आहेत. असा दावा काँग्रेसनं केला आहे.

शहरातली परिवहन सेवा मृतावस्थेत आहे. शहरातील दहा वर्षांपूर्वीच्या जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशा अनेक समस्यांनी मिरा भाईंदर मधील नागरीक त्रस्त आहेत. या निवडणुकांमध्ये देण्यात येणार्‍या आश्वासनांची पूर्तता तरी पूर्ण होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय.

अर्धवट प्रकल्प- JNNURM च्या माध्यमातून 250 बसेस येणार होत्या. आतापर्यंत फक्त 50 बसेसच आल्या आहेत. - शहरात 40 कोटी रुपयांचं सबवेचं काम अर्धवट आहे. - 450 कोटी रुपये खर्चून सुरु असलेली भुयारी गटार योजनाही अपूर्णावस्थेत आहे. - शहरातल्या डंपिंग ग्राऊन्डचा प्रकल्पही प्रलंबित आहे. -1300 कोटी रुपयांची अतिरिक्त पाणीपुरवठा योजनाही कागदावरच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close