S M L

मुंबईत वेगवेगळ्या घटनेत 2 महिलांचा मृत्यू

09 ऑगस्टमुंबईत दोन वेगवेगळे घटनांमध्ये दोन महिल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडाळ्यात आज सकाळी भक्ती पार्कमध्ये वकील तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही तरुणी दिल्लीतील एका आयएएस अधिकार्‍याची मुलगी आहे. तरुणीचं नाव पल्लवी यातव असं असून ती 25 वर्षांची होती. भक्ती पार्कमधील हिमालय हाईट्स मधील थ्री बीएचके फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. तर मालाड परिसरात 32 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालंय. मालाड पुर्व भागात साई सैनिक अपार्टमेंटच्या आवारात एका पोत्यात हा मृतदेह ठेवण्यात आला होता. बेवारस वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोतं उघडताच महिलेचा मृतदेह असल्याचं दिसलं. या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असावा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 03:33 PM IST

09 ऑगस्ट

मुंबईत दोन वेगवेगळे घटनांमध्ये दोन महिल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडाळ्यात आज सकाळी भक्ती पार्कमध्ये वकील तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही तरुणी दिल्लीतील एका आयएएस अधिकार्‍याची मुलगी आहे. तरुणीचं नाव पल्लवी यातव असं असून ती 25 वर्षांची होती. भक्ती पार्कमधील हिमालय हाईट्स मधील थ्री बीएचके फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. तर मालाड परिसरात 32 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालंय. मालाड पुर्व भागात साई सैनिक अपार्टमेंटच्या आवारात एका पोत्यात हा मृतदेह ठेवण्यात आला होता. बेवारस वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोतं उघडताच महिलेचा मृतदेह असल्याचं दिसलं. या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असावा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close