S M L

देवेंद्रो सिंगचे आव्हान संपुष्टात

09 ऑगस्टभारताचं बॉक्सिंगमधलं शेवटचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. देवेंद्रो सिंग बॉक्सिंगमध्ये दुसरं मेडल मिळवण्यात अपयशी ठरला आहे. 49 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये आयर्लंडच्या पॅडी बर्नेसनं देवेंद्रोचा 23-18 असा पराभव केला. पहिल्या दोन मॅचमध्ये देवेंद्रो सिंगने दमदार कामगिरी करत क्वार्टर फायनल गाठली. पण क्वार्टर फायनलमध्ये अनुभवी पॅडीसमोर त्याचा निभाव लागला नाही. पहिला सेट पॅडी बर्नेसनं 7-5 असा जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये 10 पॉईंटची कमाई करत मोठी आघाडी घेतली. तिसर्‍या सेटमध्ये देवेंद्रोनं चांगली लढत देत हा सेट 8-6 असा जिंकला. पण पहिल्या दोन सेटमधल्या पिछाडीमुळे त्याला पराभव पत्करावा लागला. पुरुष गटात भारताचे सातही बॉक्सर्स मेडल मिळवण्यात अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे भारताची ऍथलीट सहाना कुमारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिलांच्या हाय जम्प प्रकारात सहाना कुमारीला पात्रता फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. सहानाला 1 पॉईंट 80 मीटर उडी मारता आली. ग्रुप बी मध्ये तिला पंधराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 03:48 PM IST

देवेंद्रो सिंगचे आव्हान संपुष्टात

09 ऑगस्ट

भारताचं बॉक्सिंगमधलं शेवटचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. देवेंद्रो सिंग बॉक्सिंगमध्ये दुसरं मेडल मिळवण्यात अपयशी ठरला आहे. 49 किलो वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये आयर्लंडच्या पॅडी बर्नेसनं देवेंद्रोचा 23-18 असा पराभव केला. पहिल्या दोन मॅचमध्ये देवेंद्रो सिंगने दमदार कामगिरी करत क्वार्टर फायनल गाठली. पण क्वार्टर फायनलमध्ये अनुभवी पॅडीसमोर त्याचा निभाव लागला नाही. पहिला सेट पॅडी बर्नेसनं 7-5 असा जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये 10 पॉईंटची कमाई करत मोठी आघाडी घेतली. तिसर्‍या सेटमध्ये देवेंद्रोनं चांगली लढत देत हा सेट 8-6 असा जिंकला. पण पहिल्या दोन सेटमधल्या पिछाडीमुळे त्याला पराभव पत्करावा लागला. पुरुष गटात भारताचे सातही बॉक्सर्स मेडल मिळवण्यात अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे भारताची ऍथलीट सहाना कुमारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिलांच्या हाय जम्प प्रकारात सहाना कुमारीला पात्रता फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. सहानाला 1 पॉईंट 80 मीटर उडी मारता आली. ग्रुप बी मध्ये तिला पंधराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close