S M L

प्रफुल्ल पटेलांची फुटली घोटाळ्याची 'हंडी'?

09 ऑगस्टदिल्ली विमानतळाच्या आधुनिकीकरणामध्ये कोट्यावधींचा महसूल बुडाल्याची धक्कादायक बाब कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. आणि या घोटाळ्याचे सुत्रधार आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटचे खास सहकारी प्रफुल्ल पटेल. माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि जीएमआर कंपनी यांच्यावर कॅगचे कडक ताशेरे ओढले आहे. आयबीएन नेटवर्कच्या हाती दिल्ली विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित महत्त्वाचा कॅगचा अहवाल लागला आहे. जीएमआर (GMR) या कंपनीला केंद्र सरकारने झुकतं माप दिलं आहे. यामुळे जीएमआर सोबतच्या करारामुळे प्रवाशांचं 3,750 कोटींच नुकसान झालं आहे. तसेच या कराराने विमानतळ शुल्काचं 350 कोटींचं नुकसान आणि 239 एकर जमिनीची जिची सध्याची किंमत 24,000 कोटी रुपये आहे ही जमीन फक्त 31 लाख रुपयांना देण्यात आली आहे. हे इथेच थांबत नाही तर विमानतळ प्राधिकरणाला विकास शुल्काच्या गैरमार्गाने 3,400 कोटींचा फायदा झाल्याचंही कॅगच्या अहवालात आहे. आणि विशेष म्हणजे हा वादग्रस्त करार झाला, तेव्हा प्रफुल्ल पटेल हे नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. आम्ही कोणताही गैरव्यवहार केला नाही, असा दावा जीएमआरमधल्या सुत्रांनी केला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. कायदा मंत्रालय आणि ऍटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करून विकास शुल्क आकारलं आहे आणि प्रवाशांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं सांगण्यात येतं आहे. पण या सर्व प्रकरणाबद्दल प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला असता पटेल समोर आले नाही. नेहमी प्रफुल्ल पटेल माध्यमांना या ना त्या प्रकारात सामोरं जात असतात पण या प्रकरणाबद्दल पटेल यांच्याकडून अजून तरी काहीही उत्तर आले नाही. पटेल यांनी शांत राहणं पसंत केलं असावं पण ही शांतता वादळा अगोदरचीही ठरु शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 04:11 PM IST

प्रफुल्ल पटेलांची फुटली घोटाळ्याची 'हंडी'?

09 ऑगस्ट

दिल्ली विमानतळाच्या आधुनिकीकरणामध्ये कोट्यावधींचा महसूल बुडाल्याची धक्कादायक बाब कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. आणि या घोटाळ्याचे सुत्रधार आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटचे खास सहकारी प्रफुल्ल पटेल. माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि जीएमआर कंपनी यांच्यावर कॅगचे कडक ताशेरे ओढले आहे. आयबीएन नेटवर्कच्या हाती दिल्ली विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित महत्त्वाचा कॅगचा अहवाल लागला आहे. जीएमआर (GMR) या कंपनीला केंद्र सरकारने झुकतं माप दिलं आहे. यामुळे जीएमआर सोबतच्या करारामुळे प्रवाशांचं 3,750 कोटींच नुकसान झालं आहे.

तसेच या कराराने विमानतळ शुल्काचं 350 कोटींचं नुकसान आणि 239 एकर जमिनीची जिची सध्याची किंमत 24,000 कोटी रुपये आहे ही जमीन फक्त 31 लाख रुपयांना देण्यात आली आहे. हे इथेच थांबत नाही तर विमानतळ प्राधिकरणाला विकास शुल्काच्या गैरमार्गाने 3,400 कोटींचा फायदा झाल्याचंही कॅगच्या अहवालात आहे. आणि विशेष म्हणजे हा वादग्रस्त करार झाला, तेव्हा प्रफुल्ल पटेल हे नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. आम्ही कोणताही गैरव्यवहार केला नाही, असा दावा जीएमआरमधल्या सुत्रांनी केला आहे.

तर दुसरीकडे केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. कायदा मंत्रालय आणि ऍटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करून विकास शुल्क आकारलं आहे आणि प्रवाशांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं सांगण्यात येतं आहे. पण या सर्व प्रकरणाबद्दल प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला असता पटेल समोर आले नाही. नेहमी प्रफुल्ल पटेल माध्यमांना या ना त्या प्रकारात सामोरं जात असतात पण या प्रकरणाबद्दल पटेल यांच्याकडून अजून तरी काहीही उत्तर आले नाही. पटेल यांनी शांत राहणं पसंत केलं असावं पण ही शांतता वादळा अगोदरचीही ठरु शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close