S M L

लाईट गेल्याच्या तक्रारीवरुन वॉचमनने केला तरुणीचा खून

10 ऑगस्टमुंबईतील वडाळा परिसरात पल्लवी पुरकायस्थ या व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीचा हत्ये प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पल्लवी राहत असलेल्या बिल्डिंगचा वॉचमन पठाण याने आपण पल्लवीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पल्लवीने आपल्या घरातील लाईट वारंवार जात असल्यामुळे रात्री वॉचमन पठाणला फोन केला होता. याच कारणावरुन पल्लवी आणि वॉचमन पठाणमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात वॉचमनने पल्लवीचा खून केला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पठाणला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. वडाळा परिसरातील भक्ती पार्कमधील हिमालयीन हाईट्स या इमारतीत काल पल्लवी पुरकायस्थ या 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. पल्लवी पुरकायस्थ ही आयएएस अधिकारी आणि कृषी खात्यात जॉईंट सेक्रटरी म्हणून अटानू पुरकायस्थ यांची मुलगी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2012 12:01 PM IST

लाईट गेल्याच्या तक्रारीवरुन वॉचमनने केला तरुणीचा खून

10 ऑगस्ट

मुंबईतील वडाळा परिसरात पल्लवी पुरकायस्थ या व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीचा हत्ये प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पल्लवी राहत असलेल्या बिल्डिंगचा वॉचमन पठाण याने आपण पल्लवीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पल्लवीने आपल्या घरातील लाईट वारंवार जात असल्यामुळे रात्री वॉचमन पठाणला फोन केला होता. याच कारणावरुन पल्लवी आणि वॉचमन पठाणमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात वॉचमनने पल्लवीचा खून केला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पठाणला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. वडाळा परिसरातील भक्ती पार्कमधील हिमालयीन हाईट्स या इमारतीत काल पल्लवी पुरकायस्थ या 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. पल्लवी पुरकायस्थ ही आयएएस अधिकारी आणि कृषी खात्यात जॉईंट सेक्रटरी म्हणून अटानू पुरकायस्थ यांची मुलगी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2012 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close