S M L

बाबा रामदेव पोलिसांच्या ताब्यात

13 ऑगस्टदिल्लीत आज बाबा रामदेव यांचं आंदोलन चांगलंच गाजलं. बाबा रामदेव यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बाबा रामदेव यांनी सकाळी संसदेवर मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून रामदेव आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या सर्वांना डॉ. आंबेडकर स्टेडियमवर स्थानबद्ध केलं. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. पण बाबा रामदेव यांनी आक्रमक पवित्रा घेत स्टेडियमवरून जायला नकार दिला. जोपर्यंत सरकार समर्थकांना जेवण देत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही आणि स्टेडियमही सोडणार नाही असा इशाराच बाबा रामदेव यांनी दिला. काँग्रेससोडून आपण इतर कुणाच्याही विरोधात नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारानंतर अखेर सरकारनं नुकतंच रामदेव यांच्या समर्थकांना जेवण आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था केली. योगगुरु बाबा रामदेव आज त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार होते. त्याप्रमाणे आज रामलीला मैदानावर सकाळपासूनच गर्दी होती. विविध पक्षाचे नेते त्यांच्या व्यासपीठावर येऊन जोरदार भाषणबाजी करत होते. त्यानंतर बाबा रामदेव यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.सकाळी थोड्याच वेळात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतो, असं सांगत रामदेव बाबांनी सगळ्यांची उत्सुकता ताणून धरली होती. त्यानंतर आंदोलनाच्या व्यासपीठावरुन बाबांनी नेहमीप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली. काळ्यापैशाच्या विरोधात चालू असलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन बाबा रामदेव यांनी केलं. त्यानंतर तिथं भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, जेडीयूचे नेते शरद यादव हेही दाखल झाले. शिवाय इतर पक्षाचे नेतेही होते. त्यांच्यासमोर बाबांनी काँग्रेसवर आगपाखड केली.आंदोलनाच्या व्यासपीठावरची भाषणं संपल्यानंतर बाबांनी त्यांच्या समर्थकांसह आपला मोर्चा वळवला तो संसदेच्या दिशेनं...त्यांचा मोर्चा मध्य दिल्लीतल्या रणजित सिंग उड्डाणपुलावर हा मोर्चा आला, तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवलं. तिथंच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आता बाबा रामदेव यांना आता दिल्लीबाहेर नेऊन सोडलं जाणार आहे. आयबीएन नेटवर्कशी बोलताना बाबांनी त्यांचे 2014 चे निवडणुकीचे मनसुबे स्पष्ट केले. बाबा रामदेव यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण गेल्या तीन दिवसांपासून बाबा रामदेव यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नव्हती. पण आज मोर्चा काढून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देऊन अखेर रामदेव बाबांनी सरकारला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला लावली. ही एक त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक म्हणावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 08:40 AM IST

बाबा रामदेव पोलिसांच्या ताब्यात

13 ऑगस्ट

दिल्लीत आज बाबा रामदेव यांचं आंदोलन चांगलंच गाजलं. बाबा रामदेव यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बाबा रामदेव यांनी सकाळी संसदेवर मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून रामदेव आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या सर्वांना डॉ. आंबेडकर स्टेडियमवर स्थानबद्ध केलं. काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. पण बाबा रामदेव यांनी आक्रमक पवित्रा घेत स्टेडियमवरून जायला नकार दिला. जोपर्यंत सरकार समर्थकांना जेवण देत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही आणि स्टेडियमही सोडणार नाही असा इशाराच बाबा रामदेव यांनी दिला. काँग्रेससोडून आपण इतर कुणाच्याही विरोधात नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारानंतर अखेर सरकारनं नुकतंच रामदेव यांच्या समर्थकांना जेवण आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था केली.

योगगुरु बाबा रामदेव आज त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार होते. त्याप्रमाणे आज रामलीला मैदानावर सकाळपासूनच गर्दी होती. विविध पक्षाचे नेते त्यांच्या व्यासपीठावर येऊन जोरदार भाषणबाजी करत होते. त्यानंतर बाबा रामदेव यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सकाळी थोड्याच वेळात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतो, असं सांगत रामदेव बाबांनी सगळ्यांची उत्सुकता ताणून धरली होती. त्यानंतर आंदोलनाच्या व्यासपीठावरुन बाबांनी नेहमीप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली. काळ्यापैशाच्या विरोधात चालू असलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन बाबा रामदेव यांनी केलं. त्यानंतर तिथं भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, जेडीयूचे नेते शरद यादव हेही दाखल झाले. शिवाय इतर पक्षाचे नेतेही होते. त्यांच्यासमोर बाबांनी काँग्रेसवर आगपाखड केली.

आंदोलनाच्या व्यासपीठावरची भाषणं संपल्यानंतर बाबांनी त्यांच्या समर्थकांसह आपला मोर्चा वळवला तो संसदेच्या दिशेनं...त्यांचा मोर्चा मध्य दिल्लीतल्या रणजित सिंग उड्डाणपुलावर हा मोर्चा आला, तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवलं. तिथंच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आता बाबा रामदेव यांना आता दिल्लीबाहेर नेऊन सोडलं जाणार आहे. आयबीएन नेटवर्कशी बोलताना बाबांनी त्यांचे 2014 चे निवडणुकीचे मनसुबे स्पष्ट केले. बाबा रामदेव यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण गेल्या तीन दिवसांपासून बाबा रामदेव यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नव्हती. पण आज मोर्चा काढून स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देऊन अखेर रामदेव बाबांनी सरकारला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला लावली. ही एक त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक म्हणावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close