S M L

रत्नागिरीत जिंदाल प्रकल्पामुळे प्रदूषण, बागायती शेती धोक्यात

11 ऑगस्टरत्नागिरीमधल्या जिंदाल औष्णीक वीज प्रकल्पामुळे नांदीवडे गावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचं प्रदूषण मंडळाच्या तपासणीत पुढे आलंय. प्रदूषण मंडळाने या गावातून तपासलेल्या भूजल आणि पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने क्लोराईड आणि सल्फ़ेटने प्रदुषित आढळल्याचं अहवालात नमूद केलंय. आयबीएन लोकमतच्या हाती हा रिपोर्ट आला असून याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी आपले हात झटकले आहे गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या या प्रदुषणामुळे नांदीवडे गावातली सर्व जमीन नापिक झाल्यामुळे इथली शेती बागायतीही संपुष्टात आलीय. याबाबत प्रदूषण मंडळानेही कंपनीला फक्त काळजी घेण्याचं नाममात्र पत्र दिलंय. त्यामुळे हे प्रदूषण थांबलं नाही तर गावकर्‍यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2012 10:14 AM IST

रत्नागिरीत जिंदाल प्रकल्पामुळे प्रदूषण, बागायती शेती धोक्यात

11 ऑगस्ट

रत्नागिरीमधल्या जिंदाल औष्णीक वीज प्रकल्पामुळे नांदीवडे गावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचं प्रदूषण मंडळाच्या तपासणीत पुढे आलंय. प्रदूषण मंडळाने या गावातून तपासलेल्या भूजल आणि पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने क्लोराईड आणि सल्फ़ेटने प्रदुषित आढळल्याचं अहवालात नमूद केलंय. आयबीएन लोकमतच्या हाती हा रिपोर्ट आला असून याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी आपले हात झटकले आहे गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या या प्रदुषणामुळे नांदीवडे गावातली सर्व जमीन नापिक झाल्यामुळे इथली शेती बागायतीही संपुष्टात आलीय. याबाबत प्रदूषण मंडळानेही कंपनीला फक्त काळजी घेण्याचं नाममात्र पत्र दिलंय. त्यामुळे हे प्रदूषण थांबलं नाही तर गावकर्‍यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close