S M L

आचार्य अत्रेंच्या 'लग्नाची बेडी' नाटकाचा मुहूर्त

13 ऑगस्टआचार्य अत्रेंच्या 114 व्या जयंतीनिमित्त अत्रेंच्या लेखणीतून साकारलेल्या लग्नाची बेडी या नाटकाचा मुहूर्त आज वरळीतील आचार्य अत्रेंच्या पुतळ्यापाशी त्यांना आदरांजली वाहत करण्यात आला. नाट्यसंपदा नाट्यसंस्था लग्नाची बेडी हे आचार्य अत्रेंचे अजरामर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येतंय. आचार्य अत्रेंच्या जयंतीलाच ह्या नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आणि आचार्य अत्रे यांचे नातू ऍडव्होकेट राजेंद्र पै यांच्या हस्ते वरळी नाक्यावरील आचार्य अत्रेंच्या पुतळ्यापाशी हा मुहूर्त करण्यात आला. यावेळी नाट्यसंपदा संस्थेचे निर्माते अनंत पणशीकर, नाटकातील प्रमुख कलाकार भूषण प्रधान,समीर चौघुले उपस्थित होते. या नाटकाचं दिग्दर्शन संजय मोनेंचं आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे, वैभव मांगले , किशोरी आंबिये यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 12:24 PM IST

आचार्य अत्रेंच्या 'लग्नाची बेडी' नाटकाचा मुहूर्त

13 ऑगस्ट

आचार्य अत्रेंच्या 114 व्या जयंतीनिमित्त अत्रेंच्या लेखणीतून साकारलेल्या लग्नाची बेडी या नाटकाचा मुहूर्त आज वरळीतील आचार्य अत्रेंच्या पुतळ्यापाशी त्यांना आदरांजली वाहत करण्यात आला. नाट्यसंपदा नाट्यसंस्था लग्नाची बेडी हे आचार्य अत्रेंचे अजरामर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येतंय. आचार्य अत्रेंच्या जयंतीलाच ह्या नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आणि आचार्य अत्रे यांचे नातू ऍडव्होकेट राजेंद्र पै यांच्या हस्ते वरळी नाक्यावरील आचार्य अत्रेंच्या पुतळ्यापाशी हा मुहूर्त करण्यात आला. यावेळी नाट्यसंपदा संस्थेचे निर्माते अनंत पणशीकर, नाटकातील प्रमुख कलाकार भूषण प्रधान,समीर चौघुले उपस्थित होते. या नाटकाचं दिग्दर्शन संजय मोनेंचं आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे, वैभव मांगले , किशोरी आंबिये यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close