S M L

'माता न तु वैरणी'

13 ऑगस्टदुसरीही मुलगी झाली म्हणून काही तासांच्याच पोटच्या गोळ्याला एका मातेनं नदीकाठी सोडून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कर्वेनगर मधल्या डी.पी.रोडच्या नदीकाठी एक स्त्री अर्भक सापडलं आहे. हे अर्भक नुकतंच जन्मलं होतं आणि त्यानंतर तिला टाकुन दिलं. हे स्त्री अर्भक यशवंत सोनावणे यांना सापडले त्यांनी ते ससुन हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि विशेष म्हणजे ज्या मातेनं अर्भक नदीकाठी सोडले ती याच हॉस्पिटलमध्ये होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी होनबोले असं तिचं नाव आहे. पहिली मुलगी झाल्यानतंर दुसरा मुलगा होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र पुन्हा मुलगीच झाल्याने तिला सोडुन दिलं असल्यातं तिने सांगितलं आहे. नदीचं पाणी पहायला गेलेल्या एका तरुणाच्या संवदेनशीलतेमुळे या बाळाचा जीव वाचू शकला आहे. यशवंत वादवणे हे नदीकाठी पाणी पाहण्यासाठी म्हणून गेले असताना त्यांचा पाय एका गाठोड्याला लागला. त्या गाठोड्यामधून रडण्याचा आवाज येत असलेला ऐकून त्यांनी ते गाठोडं उघडलं. तर या गाठोड्यामध्ये एका मुलीला चादरीत गुंडाळुन नायलॉनच्या पिशवीत ठेवून या पोत्यामध्ये टाकण्यात आलं असल्याचं त्यांना दिसलं. या मुलीला बाहेर काढल्यावर तिची नाळही कापली नसल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी लगेचच पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर या बाळाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याप्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 13, 2012 03:25 PM IST

'माता न तु वैरणी'

13 ऑगस्ट

दुसरीही मुलगी झाली म्हणून काही तासांच्याच पोटच्या गोळ्याला एका मातेनं नदीकाठी सोडून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कर्वेनगर मधल्या डी.पी.रोडच्या नदीकाठी एक स्त्री अर्भक सापडलं आहे. हे अर्भक नुकतंच जन्मलं होतं आणि त्यानंतर तिला टाकुन दिलं. हे स्त्री अर्भक यशवंत सोनावणे यांना सापडले त्यांनी ते ससुन हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि विशेष म्हणजे ज्या मातेनं अर्भक नदीकाठी सोडले ती याच हॉस्पिटलमध्ये होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी होनबोले असं तिचं नाव आहे. पहिली मुलगी झाल्यानतंर दुसरा मुलगा होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र पुन्हा मुलगीच झाल्याने तिला सोडुन दिलं असल्यातं तिने सांगितलं आहे. नदीचं पाणी पहायला गेलेल्या एका तरुणाच्या संवदेनशीलतेमुळे या बाळाचा जीव वाचू शकला आहे. यशवंत वादवणे हे नदीकाठी पाणी पाहण्यासाठी म्हणून गेले असताना त्यांचा पाय एका गाठोड्याला लागला. त्या गाठोड्यामधून रडण्याचा आवाज येत असलेला ऐकून त्यांनी ते गाठोडं उघडलं. तर या गाठोड्यामध्ये एका मुलीला चादरीत गुंडाळुन नायलॉनच्या पिशवीत ठेवून या पोत्यामध्ये टाकण्यात आलं असल्याचं त्यांना दिसलं. या मुलीला बाहेर काढल्यावर तिची नाळही कापली नसल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी लगेचच पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर या बाळाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याप्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close