S M L

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचं निधन

15 ऑगस्टप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. फुफुसाच्या कॅन्सरने आजारी असलेले मेहता गेले काही महिने मुंबईतल्या कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अनेक नावाजलेल्या सिनेमांचं छायाचित्रण त्यांनी केलंय. ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मंडी आणि त्रिकाल, इजाजत, शेखर कपूर यांचा बँडिट क्वीन, शशी कपूरचा उत्सव, मेकिंग ऑफ महात्मा गांधी, जब्बार पटेल यांचा आंबेडकर, सरदार पटेल, एम.एफ.हुसेन यांचा गजगामिनी, अपर्णा सेन यांचा 36 चौरंगी लेन या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी अशोक मेहता यांनी केली होती. 1942 अ लव्ह स्टोरी या गाजलेल्या सिनेमाचंही त्यांनी छायाचित्रण केलं. अनेक जाहिरातपटांचं छायाचित्रणही त्यांनी केलं. वयाच्या 14 व्या वर्षी दिल्लीतून पळून ते मुंबईत आले. चेंबूरमधल्या आशा स्टुडिओतला एक कँटिन बॉय ते सिनेमॅटोग्राफर असा त्यांचा प्रवास होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2012 02:03 PM IST

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचं निधन

15 ऑगस्ट

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. फुफुसाच्या कॅन्सरने आजारी असलेले मेहता गेले काही महिने मुंबईतल्या कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अनेक नावाजलेल्या सिनेमांचं छायाचित्रण त्यांनी केलंय. ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मंडी आणि त्रिकाल, इजाजत, शेखर कपूर यांचा बँडिट क्वीन, शशी कपूरचा उत्सव, मेकिंग ऑफ महात्मा गांधी, जब्बार पटेल यांचा आंबेडकर, सरदार पटेल, एम.एफ.हुसेन यांचा गजगामिनी, अपर्णा सेन यांचा 36 चौरंगी लेन या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी अशोक मेहता यांनी केली होती. 1942 अ लव्ह स्टोरी या गाजलेल्या सिनेमाचंही त्यांनी छायाचित्रण केलं. अनेक जाहिरातपटांचं छायाचित्रणही त्यांनी केलं. वयाच्या 14 व्या वर्षी दिल्लीतून पळून ते मुंबईत आले. चेंबूरमधल्या आशा स्टुडिओतला एक कँटिन बॉय ते सिनेमॅटोग्राफर असा त्यांचा प्रवास होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close