S M L

देवकरांना झेंडावंदन करायला महिलांनी केला मज्जाव

15 ऑगस्टजळगावला पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते होणार्‍या झेंडावंदनाला शिवसेना भाजपने तीव्र विरोध केला होता. देवकर हे घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी असून हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द केल्याने त्यांची अटक ही निश्चित मानली जातेय. यामुळे देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करू नये, अशी मागणीही सेना भाजपने जिल्हाधिकार्‍यांना केली होती. सकाळी शिवसेनेच्या महिला आघाडीने देवकर यांच्या घरी जोरदार घोषणाबाजी केली. घराबाहेर आलेल्या देवकर आणि निदर्शक महिलांची शाब्दिक चकमकही झाली. अखेर या निदर्शकांना पोलिसांनी रोखल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 15, 2012 02:09 PM IST

देवकरांना झेंडावंदन करायला महिलांनी केला मज्जाव

15 ऑगस्ट

जळगावला पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते होणार्‍या झेंडावंदनाला शिवसेना भाजपने तीव्र विरोध केला होता. देवकर हे घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी असून हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द केल्याने त्यांची अटक ही निश्चित मानली जातेय. यामुळे देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करू नये, अशी मागणीही सेना भाजपने जिल्हाधिकार्‍यांना केली होती. सकाळी शिवसेनेच्या महिला आघाडीने देवकर यांच्या घरी जोरदार घोषणाबाजी केली. घराबाहेर आलेल्या देवकर आणि निदर्शक महिलांची शाब्दिक चकमकही झाली. अखेर या निदर्शकांना पोलिसांनी रोखल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2012 02:09 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close