S M L

'ऑपरेशन ताज' फत्ते

29 नोव्हेंबर, मुंबई9.30 AMतीन दिवसांपासून ताजमध्ये सुरू असलेली धुमश्चक्री अखेर संपुष्टात आली आहे. 59 तासांच्या कारवाईनंतर हॉटेल ताजचा ताबा मिळवण्यात एनएसजीच्या जवानांना अखेर यश मिळालं आहे. या कारवाईत एनएसजीच्या बहादूर जवानांनी आज तीन अतिरेक्यांचा खातमा केला. या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एनएसजीच्या आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. एनएसजीनं यासंदर्भात अजून अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र सर्व अतिरेक्यांचा खातमा झाला असून सध्या एनएसजीचे जवान संपूर्ण हॉटेल पिंजून काढत आहेत, एनएसजी चे डायरेक्टर जनरल जे. के. दत्ता यांनी दिली. पूर्ण हॉटेल चेक केल्यानंतर आणि सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरच कारवाई संपल्याची घोषणा करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं हॉटेल मॅनेजमेंटला ताजमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर मुंबई5.30 A.M.ताजमध्ये पहिल्या मजल्यावरून जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. ताजमध्ये सध्या तीन अतिरेकी असल्याची माहिती एनएसजीचे डी.जी. जे.के.दत्ता यांनी दिली. यापैकी एक हॉटेलच्या बॉलरूममध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं.अतिरेक्यांनी पुन्हा ग्रेनेडचा हल्ला केला. अजूनही अतिरेकी जुन्या बिल्डिंगमध्ये आहेत. त्यांच्याकडून सतत गोळीबार आणि ग्रेनेडचे हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान ताज चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले आहेत. याआधी ताजमधल्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एनएसजीचा एक जवान शहीद झाला. अतिरेक्यांना ताजचा ले-आऊट माहित होता, अशी माहिती मिळाली आहे. ताजमध्ये एनएसजीला 4 चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि 7 क्रेडिट कार्ड्स सापडले. 28 नोव्हेंबर, मुंबई10.30 PM ताजमध्ये अजूनही जोरदार गोळीबार सुरू आहे. एनएसजी आणि अतिरेकी यांच्यात जोरदार धुश्चक्री सुरू आहे. काही वेळापूर्वी ताजमध्ये आणखी एक स्फोट झाला. अतिरेक्यांनी पुन्हा ग्रेनेडचा हल्ला केला. तर कमांडोंनी रॉकेट लाँचरचा हल्ला करून त्याला उत्तर दिलं. अजूनही अतिरेकी जुन्या बिल्डिंगमध्ये आहेत. त्यांच्याकडून सतत गोळीबार आणि ग्रेनेडचे हल्ले करण्यात येत आहेत. 28 नोव्हेंबर, मुंबई9.00 PM ताजमधील कारवाई काहीशी थंडावली आहे. साधारण अर्धा तास एनएसजीच्या बाहेर उभ्या असलेल्या जवानांकडून गोळीबार झालेला नाही. एनएसजीच्या जवानांची एक तुकडी आतमध्ये गेली असून ते अतिरेक्यांचा कसून शोध घेत आहेत. त्यांच्याकडून कोणताही संकेत येईपर्यंत बाहेरच्या जवानांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असावी, असे अंदाज वर्तवण्यात येत आहे.साधारण तासाभरापूर्वी ताजच्या बँक्वेट हॉलमध्ये मोठी धुमश्चक्री झाली होती. अतिरेकी ताजच्या बॉलरूममध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात बॉलरूमचं मोठं नुकसान झालं आहे. 28 नोव्हेंबर, मुंबई7.15 PMताजमधली कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ताजमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात जमलेल्या गर्दीतील 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. यात 3 पत्रकांराचाही समावेश आहे. जखमी व्यक्तींपैकी एकाला पाठीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. अतिरेक्यांनी फेकलेल्या ग्रेनेड्समुळे हे लोक जखमी झाले. दरम्यान ताजच्या पहिल्या मजल्यावर नुकताच एक स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.बुधवारपासून चालू असलेल्या या कारवाईत ताजची जुनी बिल्डींग खाली करण्यात लष्कर यशस्वी झालं आहे. जुन्या बिल्डींगमध्ये दोन अतिरेकी असून त्यातल्या एक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अतिरेक्यांना ताजच्या रचनेची पूर्ण माहिती असून ते सतत जागा बदलत असल्यामुळे पोलिसांना कारवाई पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.संध्याकाळी अतिरेक्यांनी पुन्हा ग्रेनेडचा हल्ला केला. दरम्यान काल साडे चारच्या सुमारास झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. ताजमधल्या आजच्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एनएसजीचा एक जवान शहीद झालाय. दहशतवाद्यांना पाक नौदलाकडून ट्रेनिंग 29 नोव्हेंबर, मुंबई मुबईतल्या महाभयंकर हल्ल्याच्या कटाची धक्कादायक माहिती आता पुढं येतेय.या हल्ल्यामागं पाकिस्तान असल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचा दावाही गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलाय. पाकव्याप्त मंगल डॅम इथे या सर्व अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या अतिरेक्यांकडे मुंबईचे डिजीटल मॅप होते तसंच पाक नौदलानं त्यांना ट्रेनिंग दिलं होतं.अतिरेकी दोन ग्रुपमध्ये मुंबईत आले होते. ससून डॉक आणि बधवार पार्क इथे अतिरेकी उतरले. मोहम्मद अफझल कासम या अटकेत असलेल्या अतिरेक्याने ही महत्त्वाची माहिती दिलीय. त्याच्या युरीन आणि ब्लड टेस्ट मध्ये त्यानं ड्रग घेतल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती एटीएस च्या सूत्रांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2008 04:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2008 04:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close