S M L

पोळा सणावर दुष्काळाचं संकट

संजय सरोदे, जालना 17 ऑगस्टशेतकर्‍याचा खरा साथी बैल...याच बैलाच्या उपकारांची जाण ठेवत दरवर्षी बैल पोळा सण शेतकरी साजरा करतात. पण यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे. अर्धा पावसाळा संपलाय तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस नाही. माणसांना आणि जनावरांनाही पाणी मिळायला अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. समाधानकारक पाऊस पडेल आणि आपल्याला भरपुर उत्पन्न होईल या आशेवर शेतकर्‍यांनी कर्ज काढलं पण पावसाने घात केला. त्यामुळे पोळा साजरा कसा करावा हाच प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे. मराठवाड्‌यात जवळपास सर्वचं शेतकर्‍यांची ही परिस्थिती आहे. सर्वच शेतकर्‍यांची हीच स्थिती आहे. पेरणीपुरता पाऊस झाला आणि नंतर पावसाने तडी दिल्याने पिंक आता संपण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यात धरणही कोरडी ठाक पडलीत गावागावात सध्या हीच स्थिती आहे. चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनलाय पाणीटंचाईवर उपाययोजना व्हावी यासाठी सत्ताधारी मंत्रीही आता हीच मागणी करत आहेत.एप्रिलपासून मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात ही स्थिती बदलेल असं वाटत होतं. मात्र आता सर्वच आशा संपुष्टात आल्या. सण तर सोडाच पण जनावरांना चारा आणि पाणी कसे मिळेल याचीच चिंता शेतकर्‍यांना आहे. मराठवाड्यात केंद्राच्या पथकाने दुष्काळाची पाहणी केली. मोठी चर्चाही झाली. पण शेतकर्‍यांच्या हाती अजुनपर्यंत काही लागलं नाही. त्यामुळे आता त्वरित काहीतरी मिळाल्याशिवाय शेतकरी तगनार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2012 02:08 PM IST

पोळा सणावर दुष्काळाचं संकट

संजय सरोदे, जालना

17 ऑगस्ट

शेतकर्‍याचा खरा साथी बैल...याच बैलाच्या उपकारांची जाण ठेवत दरवर्षी बैल पोळा सण शेतकरी साजरा करतात. पण यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे. अर्धा पावसाळा संपलाय तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस नाही. माणसांना आणि जनावरांनाही पाणी मिळायला अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. समाधानकारक पाऊस पडेल आणि आपल्याला भरपुर उत्पन्न होईल या आशेवर शेतकर्‍यांनी कर्ज काढलं पण पावसाने घात केला. त्यामुळे पोळा साजरा कसा करावा हाच प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे.

मराठवाड्‌यात जवळपास सर्वचं शेतकर्‍यांची ही परिस्थिती आहे. सर्वच शेतकर्‍यांची हीच स्थिती आहे. पेरणीपुरता पाऊस झाला आणि नंतर पावसाने तडी दिल्याने पिंक आता संपण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यात धरणही कोरडी ठाक पडलीत गावागावात सध्या हीच स्थिती आहे. चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनलाय पाणीटंचाईवर उपाययोजना व्हावी यासाठी सत्ताधारी मंत्रीही आता हीच मागणी करत आहेत.

एप्रिलपासून मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात ही स्थिती बदलेल असं वाटत होतं. मात्र आता सर्वच आशा संपुष्टात आल्या. सण तर सोडाच पण जनावरांना चारा आणि पाणी कसे मिळेल याचीच चिंता शेतकर्‍यांना आहे. मराठवाड्यात केंद्राच्या पथकाने दुष्काळाची पाहणी केली. मोठी चर्चाही झाली. पण शेतकर्‍यांच्या हाती अजुनपर्यंत काही लागलं नाही. त्यामुळे आता त्वरित काहीतरी मिळाल्याशिवाय शेतकरी तगनार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2012 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close