S M L

मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार

16 ऑगस्टमुंबईकरांना दिलासा देणारी बातमी...मुंबईसह राज्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे अखेर कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. म्हणूनच कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान कृत्रिम पाऊस पाडणार आहे. 12 दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा धरण क्षेत्रात पाऊस पाडला जाणार आहे. यासाठी 12 कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. मॅकोरेट या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलंय. या प्रयोगाचे निष्कर्ष येईपर्यंत मुंबईतली 10 टक्के पाणीकपात सुरूच राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2012 03:30 PM IST

मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार

16 ऑगस्ट

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी...मुंबईसह राज्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे अखेर कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. म्हणूनच कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान कृत्रिम पाऊस पाडणार आहे. 12 दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा धरण क्षेत्रात पाऊस पाडला जाणार आहे. यासाठी 12 कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. मॅकोरेट या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलंय. या प्रयोगाचे निष्कर्ष येईपर्यंत मुंबईतली 10 टक्के पाणीकपात सुरूच राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2012 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close