S M L

बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अफवांना ऊत

16 ऑगस्टआसाम हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर बंगळुरूमध्येही अफवांना ऊत आला आहे. बंगळुरूमध्ये ईशान्य भारतीयांना लक्ष्य केलं जात असल्याची जोरदार अफवा उठली आणि 15 ऑगस्टला तब्बल 4 हजार लोकांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या दशकभरापासून ही माणसं बंगळुरूमध्ये राहत होती. आसाममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बंगळुरूमधल्या ईशान्य भारतीयांवर हल्ले होतं असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. पण तसा एकही गुन्हा पोलिसांकडे दाखल करण्यात आला नाही. ही बातमी मिळताच कर्नाटक प्रशासनाने तात्काळ बैठक बोलावली आणि लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. हैदराबादमध्येही अशीच परिस्थिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 16, 2012 04:53 PM IST

बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अफवांना ऊत

16 ऑगस्ट

आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर बंगळुरूमध्येही अफवांना ऊत आला आहे. बंगळुरूमध्ये ईशान्य भारतीयांना लक्ष्य केलं जात असल्याची जोरदार अफवा उठली आणि 15 ऑगस्टला तब्बल 4 हजार लोकांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या दशकभरापासून ही माणसं बंगळुरूमध्ये राहत होती. आसाममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बंगळुरूमधल्या ईशान्य भारतीयांवर हल्ले होतं असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. पण तसा एकही गुन्हा पोलिसांकडे दाखल करण्यात आला नाही. ही बातमी मिळताच कर्नाटक प्रशासनाने तात्काळ बैठक बोलावली आणि लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. हैदराबादमध्येही अशीच परिस्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2012 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close