S M L

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेच्या तारांमुळे स्फोट, एक जखमी

17 ऑगस्टपुण्यात कमी तीव्रतेचे साखळी स्फोट होण्याची घटना ताजी असताना आज पिंपरी चिंचवडमध्ये डांगे चौकात एक कमी तीव्रतेचा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. शहरातील अश्विनी नर्सिंग होमसमोर हा स्फोट झाला. पण हा स्फोट विजेच्या तारांमुळे झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गृहमंत्री आर आर पाटील यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक पाच वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पियूष संतोष वाळूंज असं या जखमी मुलाचं नाव आहे. त्याला तातडीने नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तात्काळ दाखल झाले. पण हा स्फोट विजेच्या तारामुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2012 02:51 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेच्या तारांमुळे स्फोट, एक जखमी

17 ऑगस्ट

पुण्यात कमी तीव्रतेचे साखळी स्फोट होण्याची घटना ताजी असताना आज पिंपरी चिंचवडमध्ये डांगे चौकात एक कमी तीव्रतेचा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. शहरातील अश्विनी नर्सिंग होमसमोर हा स्फोट झाला. पण हा स्फोट विजेच्या तारांमुळे झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गृहमंत्री आर आर पाटील यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक पाच वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पियूष संतोष वाळूंज असं या जखमी मुलाचं नाव आहे. त्याला तातडीने नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तात्काळ दाखल झाले. पण हा स्फोट विजेच्या तारामुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2012 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close