S M L

आबा,पटनायक, राजीनामा द्या - उध्दव ठाकरे

20 ऑगस्ट11 ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसटीवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मनसे, भाजपपाठोपाठ शिवसेनेनंही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्याचबरोबर दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचे शिवसेनेनं इशारा दिला आहे. हिंसाचाराच्यावेळी हिंसक जमावाने आझाद मैदानाशेजारी असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती. हे स्मारक आता पुन्हा उभं करण्यात आलंय. या स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांवर सडकून टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 10:14 AM IST

आबा,पटनायक, राजीनामा द्या - उध्दव ठाकरे

20 ऑगस्ट

11 ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसटीवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मनसे, भाजपपाठोपाठ शिवसेनेनंही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्याचबरोबर दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचे शिवसेनेनं इशारा दिला आहे. हिंसाचाराच्यावेळी हिंसक जमावाने आझाद मैदानाशेजारी असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती. हे स्मारक आता पुन्हा उभं करण्यात आलंय. या स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांवर सडकून टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close