S M L

अंडर 19 वर्ल्ड कप: भारत सेमीफायनलमध्ये

20 ऑगस्टअंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतातने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये चुरशीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 1 विकेट आणि 2 ओव्हर राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्तानने भारतासमोर 137 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारतातर्फे संदीप शर्मा आणि रवीकांत सिंग यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत पाकिस्तानला दणका दिला. याला उत्तर देताना भारताची सुरुवातही खराब झाली. अवघ्या 8 रन्समध्ये भारताचे तीन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. पण यानंतर बाबा अपराजीत आणि विजय झोल यांनी भारताची इनिंग सावरली. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 76 रन्सची पार्टनरशिप केली. ही जोडी आऊट झाली आणि पुन्हा एकदा भारताची पडझड सुरु झाली. 127 रन्सवर 9 विकेट अशी भारताची अवस्था असताना हरमीत सिंगनं 13 रन्स करत भारताला शानदार विजय मिळवून दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2012 11:20 AM IST

अंडर 19 वर्ल्ड कप: भारत सेमीफायनलमध्ये

20 ऑगस्ट

अंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतातने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये चुरशीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 1 विकेट आणि 2 ओव्हर राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्तानने भारतासमोर 137 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारतातर्फे संदीप शर्मा आणि रवीकांत सिंग यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत पाकिस्तानला दणका दिला. याला उत्तर देताना भारताची सुरुवातही खराब झाली. अवघ्या 8 रन्समध्ये भारताचे तीन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. पण यानंतर बाबा अपराजीत आणि विजय झोल यांनी भारताची इनिंग सावरली. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 76 रन्सची पार्टनरशिप केली. ही जोडी आऊट झाली आणि पुन्हा एकदा भारताची पडझड सुरु झाली. 127 रन्सवर 9 विकेट अशी भारताची अवस्था असताना हरमीत सिंगनं 13 रन्स करत भारताला शानदार विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close