S M L

एमईटी प्रकरणी भुजबळांविरोधात 10 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी

21 ऑगस्टमुंबई एज्यकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET) मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधीची अंतिम सुनावणी 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एमईटीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी याचिका एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. पोलिसांनी या आरोपांचा तपास करायला नकार दिला. पुरावे नष्ट करायला सुरुवात झालीय. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, असं कर्वे यांचं म्हणणं आहे. एमईटीच्या 199 कोटींच्या निधीचा भुजबळ कुटुंबीयांना खाजगी वापरासाठी उपयोग केल्याचं कर्वेंचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2012 04:55 PM IST

एमईटी प्रकरणी भुजबळांविरोधात 10 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी

21 ऑगस्ट

मुंबई एज्यकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET) मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधीची अंतिम सुनावणी 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एमईटीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी याचिका एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. पोलिसांनी या आरोपांचा तपास करायला नकार दिला. पुरावे नष्ट करायला सुरुवात झालीय. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, असं कर्वे यांचं म्हणणं आहे. एमईटीच्या 199 कोटींच्या निधीचा भुजबळ कुटुंबीयांना खाजगी वापरासाठी उपयोग केल्याचं कर्वेंचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2012 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close