S M L

राज्यात अखेर दुष्काळ जाहीर

22 ऑगस्टराज्य सरकारने अखेर राज्यात दुष्काळ पडल्याची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्ह्यातील 123 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या मोजणीचं काम सुरू असून आणखी दुष्काळग्रस्त तालुके मोजण्याचं काम सुरू आहे. तसेच केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहे. दुष्काळाचा फटका सर्वाधिक सांगली,सातारा, मराठवाड्याला बसला आहे. मराठवाडयात तीव्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी नाही, चारा नाही त्याबरोबरच शेतीमधील पिकं वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी घेतलेली कर्ज फेडणंही अशक्य आहे. याचा विचार करुन सरकारनी शेतकर्‍यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शिवाय कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली पाहिजे अशी मागणी राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री आणि जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्याशी चर्चा करुन कॅबिनेटमध्ये विनंती करणार असल्याचही राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये सांगितलंय. जालना जिल्हयातील सर्वच तालुक्यात अतिशय गंभीर स्थिती असल्यानं त्यांनी ही मागणी करण्याचा निर्णय घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2012 09:17 AM IST

राज्यात अखेर दुष्काळ जाहीर

22 ऑगस्ट

राज्य सरकारने अखेर राज्यात दुष्काळ पडल्याची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्ह्यातील 123 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या मोजणीचं काम सुरू असून आणखी दुष्काळग्रस्त तालुके मोजण्याचं काम सुरू आहे. तसेच केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहे.

दुष्काळाचा फटका सर्वाधिक सांगली,सातारा, मराठवाड्याला बसला आहे. मराठवाडयात तीव्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी नाही, चारा नाही त्याबरोबरच शेतीमधील पिकं वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी घेतलेली कर्ज फेडणंही अशक्य आहे. याचा विचार करुन सरकारनी शेतकर्‍यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शिवाय कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली पाहिजे अशी मागणी राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री आणि जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्याशी चर्चा करुन कॅबिनेटमध्ये विनंती करणार असल्याचही राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये सांगितलंय. जालना जिल्हयातील सर्वच तालुक्यात अतिशय गंभीर स्थिती असल्यानं त्यांनी ही मागणी करण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2012 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close