S M L

'सामना'मध्ये झळकला मनसेचा मोर्चा

22 ऑगस्टमनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल मंगळवारी आझाद मैदानावरुन थेट हल्लाबोल करत गृहमंत्री आर.आर.पाटीलआणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज ठाकरेंच्या या मोर्चाची शिवसेनेनंही चांगलीच दखल घेतली आहे. सेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये पहिल्या पानावर राज ठाकरेंच्या या मोर्चाची 'पोलिसांवर हात टाकणार्‍यांना तिथल्या तिथेच फोडून काढा !' अशी बातमी छापण्यात आली आहे. एरवी राज ठाकरे किंवा मनसेला फारसं महत्व न देता त्यांच्या संदर्भातील बातम्यांना फारसी प्रसिद्धी दिली जात नाही. पण आज शिवसेनेनं राज ठाकरेंच्या भाषणाची सविस्तर बातमी छापली. तसेच मोर्चाला प्रचंड गर्दी होती असंही वर्णन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या आजारपणानंतर दोन्ही भावांमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. त्याला या बातमीच्या प्रसिद्धीमुळे पुन्हा वेग आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2012 12:57 PM IST

'सामना'मध्ये झळकला मनसेचा मोर्चा

22 ऑगस्ट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल मंगळवारी आझाद मैदानावरुन थेट हल्लाबोल करत गृहमंत्री आर.आर.पाटीलआणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज ठाकरेंच्या या मोर्चाची शिवसेनेनंही चांगलीच दखल घेतली आहे. सेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये पहिल्या पानावर राज ठाकरेंच्या या मोर्चाची 'पोलिसांवर हात टाकणार्‍यांना तिथल्या तिथेच फोडून काढा !' अशी बातमी छापण्यात आली आहे. एरवी राज ठाकरे किंवा मनसेला फारसं महत्व न देता त्यांच्या संदर्भातील बातम्यांना फारसी प्रसिद्धी दिली जात नाही. पण आज शिवसेनेनं राज ठाकरेंच्या भाषणाची सविस्तर बातमी छापली. तसेच मोर्चाला प्रचंड गर्दी होती असंही वर्णन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या आजारपणानंतर दोन्ही भावांमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. त्याला या बातमीच्या प्रसिद्धीमुळे पुन्हा वेग आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2012 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close