S M L

पटनायकांच्या बदली मागे शरद पवारांचा गेम ?

24 ऑगस्टराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र हलवल्यानंतरचं अरुप पटनायक यांची पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्याचं समजतंय. पटनायक यांची बदली आणि त्यांच्या जागी सत्यपाल सिंग यांना नेमण्याचा आर.आर. पाटील यांचा प्रस्ताव होता. पण मुख्यमंत्री मात्र अजित पवार यांच्या मर्जीतले पोलीस अधिकारी असलेले सत्यपाल सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणण्यास तयार नव्हते. त्यामुळे अरुप पटनायक यांच्या बदलीच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी मुख्यमंत्री टाळाटाळा करत होते. अखेर शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री चव्हाण यांनाही फोन करुन अरुप पटनायक यांची उचलबांगडी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पटनायकांच्या बदलीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. हा गौप्यस्फोट आयबीएन-लोकमतने सर्वात आधी केला होता. 11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचारनंतर तिसर्‍याच दिवशी पटनायकांच्या बदलीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण अशा परिस्थिती पटनायकांची बदली होण्यावर मुख्यमंत्री ठाम नव्हते. पण खुद्द शरद पवारांनी फोन केल्यामुळे पटनायकांची उचलबांगडी करावी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 11:49 AM IST

पटनायकांच्या बदली मागे शरद पवारांचा गेम ?

24 ऑगस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र हलवल्यानंतरचं अरुप पटनायक यांची पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्याचं समजतंय. पटनायक यांची बदली आणि त्यांच्या जागी सत्यपाल सिंग यांना नेमण्याचा आर.आर. पाटील यांचा प्रस्ताव होता. पण मुख्यमंत्री मात्र अजित पवार यांच्या मर्जीतले पोलीस अधिकारी असलेले सत्यपाल सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणण्यास तयार नव्हते. त्यामुळे अरुप पटनायक यांच्या बदलीच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी मुख्यमंत्री टाळाटाळा करत होते. अखेर शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री चव्हाण यांनाही फोन करुन अरुप पटनायक यांची उचलबांगडी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पटनायकांच्या बदलीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. हा गौप्यस्फोट आयबीएन-लोकमतने सर्वात आधी केला होता. 11 ऑगस्टला झालेल्या हिंसाचारनंतर तिसर्‍याच दिवशी पटनायकांच्या बदलीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण अशा परिस्थिती पटनायकांची बदली होण्यावर मुख्यमंत्री ठाम नव्हते. पण खुद्द शरद पवारांनी फोन केल्यामुळे पटनायकांची उचलबांगडी करावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close