S M L

दुष्काळासाठी राज्याची केंद्राकडे 5 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी

24 ऑगस्टराज्यातील दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे सुमारे 5 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी करणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात पतंगराव कदम, शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, राधाकृष्ण विखे पाटील, लक्ष्मणराव ढोबळे हेसुद्धा आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी 10 जनपथवर पोहोचले आहेत. नेमक्या काय मागण्या केल्या जाणार आहेत ?- केंद्राकडे 3011 कोटींच्या पॅकेजची मागणी- त्यातील 750 कोटींचा शेतकर्‍यांसाठी मदतनिधी- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दर हेक्टरी 3000 रु. भरपाई - दुष्काळाव्यतिरीक्त जलसिंचन आणि दुष्काळी भागांतील प्रकल्पांसाठी 2217 कोटींच्या पॅकेजची मागणी

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 10:33 AM IST

दुष्काळासाठी राज्याची केंद्राकडे 5 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी

24 ऑगस्ट

राज्यातील दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे सुमारे 5 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी करणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठीच दिल्लीत दाखल झाले आहेत. ते कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात पतंगराव कदम, शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, राधाकृष्ण विखे पाटील, लक्ष्मणराव ढोबळे हेसुद्धा आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी 10 जनपथवर पोहोचले आहेत.

नेमक्या काय मागण्या केल्या जाणार आहेत ?- केंद्राकडे 3011 कोटींच्या पॅकेजची मागणी- त्यातील 750 कोटींचा शेतकर्‍यांसाठी मदतनिधी- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दर हेक्टरी 3000 रु. भरपाई - दुष्काळाव्यतिरीक्त जलसिंचन आणि दुष्काळी भागांतील प्रकल्पांसाठी 2217 कोटींच्या पॅकेजची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close