S M L

महिला पोलिसांवर हल्ल्याची महिला आयोग करणार चौकशी

24 ऑगस्टमुंबईत 11 ऑगस्टला झालेल्या सीएसटी हिंसाचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग चौकशी करणार आहे. महिला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी हा आयोग करणार आहे. ममता शर्मा यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत निर्मला सामंत प्रभावळकर यांचाही समावेश आहे. रझा अकादमीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले होते. संतप्त जमावाने बेस्ट बसेस, पोलिसांची वाहन आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनाची तोडफोड करुन पेटवून दिली होती. हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर पोलिसांवरही हल्ला चढवला. यावेळी महिला पोलीस कर्मचार्‍यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी राजकीय पक्षांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला. काल गुरुवारीच अरुप पटनायक यांची पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. आता महिलांवर अत्याचार झाल्या प्रकरणी तब्बल 13 दिवसांनंतर महिला आयोगाने दखल घेत चौकशी करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 04:56 PM IST

महिला पोलिसांवर हल्ल्याची महिला आयोग करणार चौकशी

24 ऑगस्ट

मुंबईत 11 ऑगस्टला झालेल्या सीएसटी हिंसाचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग चौकशी करणार आहे. महिला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी हा आयोग करणार आहे. ममता शर्मा यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत निर्मला सामंत प्रभावळकर यांचाही समावेश आहे. रझा अकादमीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले होते. संतप्त जमावाने बेस्ट बसेस, पोलिसांची वाहन आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनाची तोडफोड करुन पेटवून दिली होती. हा जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर पोलिसांवरही हल्ला चढवला. यावेळी महिला पोलीस कर्मचार्‍यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी राजकीय पक्षांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला. काल गुरुवारीच अरुप पटनायक यांची पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. आता महिलांवर अत्याचार झाल्या प्रकरणी तब्बल 13 दिवसांनंतर महिला आयोगाने दखल घेत चौकशी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close