S M L

जामसांडेकर खून प्रकरणी अरुण गवळीसह 12 जण दोषी

24 ऑगस्टअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अरूण गवळीच्या शिक्षेबाबत आता सोमवारी कोर्ट निर्णय देणार आहे. मुंबईने आजवर अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स पाहिले. पण यातला कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडू शकला नाही. पण आता अरूण गवळी एका खून खटल्यात दोषी सिद्ध झाला आहे. मुंबईतल्या घाटकोपर असल्फा इथले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2 मार्च 2007 ला हत्या करण्यात आली. जामसांडेकर हे आपल्या घरात बसलेले असताना दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी अरूण गवळीसोबत बारा जणांना कोर्टानं दोषी ठरवलंय. गवळी आणि इतरांना मोक्का लावण्यात आला होता. चार वर्षं खटला चालल्यानंतर.. मुंबई सेशन कोर्टातल्या न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण गवळीसोबत बारा जणांना दोषी ठरवलं.पोलीस सह आयुक्त हिमांशू रॉय म्हणतात, जामसांडेकर केस मध्ये आज गवळी आणि बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयाने आमच्या तपासाची प्रशंसा केलीय. हे आमचं यश आहे.क्राईम ब्रँचने चार वर्षांच्या तपासानंतर हे यश मिळवलंय. शिवसेनेचे नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं सिद्ध झालंय.साहेबराव हा शिवसेनेत उपशाखा प्रमुख असताना जामसांडेकर हे त्यांचे सहकारी होते.मात्र, जामसांडेकर प्रथम अपक्ष निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी भिंताडे यांचा तीन वेळा पराभव केला.त्यामुळे चिडून साहेबराव भिंताडे याने तीस लाखाची सुपारी देऊन जामसांडेकर यांचा गवळी मार्फत काटा काढला. जामसांडेकर खून खटला- साहेबराव भिंताडेने जामसांडेकरांची सुपारी गवळीचे सहकारी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना दिली - जामसांडेकर यांना मारण्यासाठी गवळी गँगने 30 लाख रुपयांची सुपारी घेतली- अरुण गवळीने जामसांडेकर यांना मारण्याची जबाबदारी प्रताप गोडसेवर सोपवली- प्रताप गोडसेने हे काम विजय गिरीवर सोपवलं- विजय गिरीने नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडली- या कामात नरेंद्र गिरी, अशोक जैयस्वाल, अनिल गिरी यांनी पाळत ठेवून मदत केलीपण अरूण गवळी निर्दोष असल्याच्या दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. ते आता हायकोर्टात अपील करणार आहेत. या प्रकरणातील इतर सरेंद्र पांचाळ, गणेश साळवी आणि दिनेश नारकर यांना पुराव्याअभावी सोडण्यात आलंय. तर आरोपी बाळा सुर्वे याचा न्यायालयीन कोठडीत आजारपणा मुळे मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 10:53 AM IST

जामसांडेकर खून प्रकरणी अरुण गवळीसह 12 जण दोषी

24 ऑगस्ट

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या खटल्यातील 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अरूण गवळीच्या शिक्षेबाबत आता सोमवारी कोर्ट निर्णय देणार आहे.

मुंबईने आजवर अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स पाहिले. पण यातला कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडू शकला नाही. पण आता अरूण गवळी एका खून खटल्यात दोषी सिद्ध झाला आहे. मुंबईतल्या घाटकोपर असल्फा इथले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2 मार्च 2007 ला हत्या करण्यात आली. जामसांडेकर हे आपल्या घरात बसलेले असताना दोन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी अरूण गवळीसोबत बारा जणांना कोर्टानं दोषी ठरवलंय. गवळी आणि इतरांना मोक्का लावण्यात आला होता. चार वर्षं खटला चालल्यानंतर.. मुंबई सेशन कोर्टातल्या न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण गवळीसोबत बारा जणांना दोषी ठरवलं.पोलीस सह आयुक्त हिमांशू रॉय म्हणतात, जामसांडेकर केस मध्ये आज गवळी आणि बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयाने आमच्या तपासाची प्रशंसा केलीय. हे आमचं यश आहे.

क्राईम ब्रँचने चार वर्षांच्या तपासानंतर हे यश मिळवलंय. शिवसेनेचे नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं सिद्ध झालंय.

साहेबराव हा शिवसेनेत उपशाखा प्रमुख असताना जामसांडेकर हे त्यांचे सहकारी होते.मात्र, जामसांडेकर प्रथम अपक्ष निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी भिंताडे यांचा तीन वेळा पराभव केला.त्यामुळे चिडून साहेबराव भिंताडे याने तीस लाखाची सुपारी देऊन जामसांडेकर यांचा गवळी मार्फत काटा काढला.

जामसांडेकर खून खटला- साहेबराव भिंताडेने जामसांडेकरांची सुपारी गवळीचे सहकारी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना दिली - जामसांडेकर यांना मारण्यासाठी गवळी गँगने 30 लाख रुपयांची सुपारी घेतली- अरुण गवळीने जामसांडेकर यांना मारण्याची जबाबदारी प्रताप गोडसेवर सोपवली- प्रताप गोडसेने हे काम विजय गिरीवर सोपवलं- विजय गिरीने नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडली- या कामात नरेंद्र गिरी, अशोक जैयस्वाल, अनिल गिरी यांनी पाळत ठेवून मदत केली

पण अरूण गवळी निर्दोष असल्याच्या दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. ते आता हायकोर्टात अपील करणार आहेत. या प्रकरणातील इतर सरेंद्र पांचाळ, गणेश साळवी आणि दिनेश नारकर यांना पुराव्याअभावी सोडण्यात आलंय. तर आरोपी बाळा सुर्वे याचा न्यायालयीन कोठडीत आजारपणा मुळे मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close