S M L

किरण बेदी आणि केजरीवाल यांच्यात मतभेद उघड

27 ऑगस्टजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य सहकारी सहकारी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले आहे. भाजप नाही तर सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्याची गरज आहे. यापुढेही सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्यात येणार असेल तरच आंदोलनात सहभागी होऊ असं बेदी यांनी स्पष्ट करुन टाकलं आहे. सत्ताधारी पक्ष कायदे बनवू शकतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं पाहिजे. प्रत्येकालाच विरोध केला तर तुमच्याबरोबर कोण येणार, असा सवालही बेदी यांनी विचारला आहे.काल रविवारी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इंडियाअगेन्सट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा निषेध म्हणून रॅली काढली होती या रॅलीत मात्र किरण बेदी सहभागी झालेल्या नव्हत्या. टीम अण्णा आता राजकारणात उतरणार आहे अशी घोषणा करत अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. यानंतर अण्णांनी माध्यमांशी बोलणं बंद केलं. तर दुसरीकडे बेदी आणि केजरीवाल एकमेकांच्या विरोधात सुर लगावत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 01:42 PM IST

किरण बेदी आणि केजरीवाल यांच्यात मतभेद उघड

27 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य सहकारी सहकारी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले आहे. भाजप नाही तर सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्याची गरज आहे. यापुढेही सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्यात येणार असेल तरच आंदोलनात सहभागी होऊ असं बेदी यांनी स्पष्ट करुन टाकलं आहे. सत्ताधारी पक्ष कायदे बनवू शकतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं पाहिजे. प्रत्येकालाच विरोध केला तर तुमच्याबरोबर कोण येणार, असा सवालही बेदी यांनी विचारला आहे.काल रविवारी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इंडियाअगेन्सट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा निषेध म्हणून रॅली काढली होती या रॅलीत मात्र किरण बेदी सहभागी झालेल्या नव्हत्या. टीम अण्णा आता राजकारणात उतरणार आहे अशी घोषणा करत अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. यानंतर अण्णांनी माध्यमांशी बोलणं बंद केलं. तर दुसरीकडे बेदी आणि केजरीवाल एकमेकांच्या विरोधात सुर लगावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close