S M L

मारुती नवलेंनी सुप्रीम कोर्टातील याचिका घेतली मागे

27 ऑगस्टपुण्यातील पवन गांधी ट्रस्टची जमीन बळकावल्याप्रकरणी अडचणीत असलेले सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांनी सुप्रीम कोर्टातली याचिका अचानक मागे घेतली आहे. नवलेंनी हे प्रकरण दिवाणी असून फौजदारी नाही असं सांगत गुन्हा मागे घ्यावा आणि तक्रारदार चैनसुख गांधी आणि पोलिसांनी दाखल केलेली केस रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. आता नवलेंनी याचिका मागे घेतल्याने नवलेंच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. नवलेंनी पवन गांधींचा पुतळा पळवून नेल्याची नवी तक्रारही चैनसुख गांधी यांनी केलीय. पण पौड पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहे असं गांधींचं म्हणणं आहे. तर पवन गांधी ट्रस्टचे विश्वस्त रवी बराटे यांनी नवले यांना लवकरच अटक होईल असा दावा केला आहे. आता लवकरच नवलेंच्या जामीनावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 04:25 PM IST

मारुती नवलेंनी सुप्रीम कोर्टातील याचिका घेतली मागे

27 ऑगस्ट

पुण्यातील पवन गांधी ट्रस्टची जमीन बळकावल्याप्रकरणी अडचणीत असलेले सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांनी सुप्रीम कोर्टातली याचिका अचानक मागे घेतली आहे. नवलेंनी हे प्रकरण दिवाणी असून फौजदारी नाही असं सांगत गुन्हा मागे घ्यावा आणि तक्रारदार चैनसुख गांधी आणि पोलिसांनी दाखल केलेली केस रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. आता नवलेंनी याचिका मागे घेतल्याने नवलेंच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. नवलेंनी पवन गांधींचा पुतळा पळवून नेल्याची नवी तक्रारही चैनसुख गांधी यांनी केलीय. पण पौड पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहे असं गांधींचं म्हणणं आहे. तर पवन गांधी ट्रस्टचे विश्वस्त रवी बराटे यांनी नवले यांना लवकरच अटक होईल असा दावा केला आहे. आता लवकरच नवलेंच्या जामीनावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close