S M L

पुण्यात 'पे ऍण्ड पार्क'नं पुन्हा काढलं डोकवर

27 ऑगस्टपुणे शहरातल्या रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क करण्याची योजना 2010 मध्ये बंद केल्यानंतर ती राबवण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. यानुसार पहिल्या अर्धा तासासाठी मोफत पार्किंगला त्यानंतरच्या अर्धा ते एक तासापर्यंत दोन रुपये तर एक तासाच्या पुढे ताशी 3 रुपयांप्रमाणे पैसे आकारले जाणार आहेत. उद्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. पण काहीही झालं तरी भाजप या प्रस्तावाला विरोध करेल अशी भुमिका भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी जाहिर केली आहे. पुणे महापालिकेनी राबवलेली ही पे ऍण्ड पार्कची योजना 2010 मध्ये रद्द करण्यात आली होती. मग पुन्हा आता पे ऍण्ड पार्कची योजना कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही आधीच एवढा टॅक्स भरतो पुन्हा रस्त्यावर गाड्या पार्क करण्यासाठी भुर्दंड कशासाठी सोसायचा असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 04:30 PM IST

पुण्यात 'पे ऍण्ड पार्क'नं पुन्हा काढलं डोकवर

27 ऑगस्ट

पुणे शहरातल्या रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क करण्याची योजना 2010 मध्ये बंद केल्यानंतर ती राबवण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. यानुसार पहिल्या अर्धा तासासाठी मोफत पार्किंगला त्यानंतरच्या अर्धा ते एक तासापर्यंत दोन रुपये तर एक तासाच्या पुढे ताशी 3 रुपयांप्रमाणे पैसे आकारले जाणार आहेत. उद्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. पण काहीही झालं तरी भाजप या प्रस्तावाला विरोध करेल अशी भुमिका भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी जाहिर केली आहे. पुणे महापालिकेनी राबवलेली ही पे ऍण्ड पार्कची योजना 2010 मध्ये रद्द करण्यात आली होती. मग पुन्हा आता पे ऍण्ड पार्कची योजना कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही आधीच एवढा टॅक्स भरतो पुन्हा रस्त्यावर गाड्या पार्क करण्यासाठी भुर्दंड कशासाठी सोसायचा असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close