S M L

खाण वाटपाची पूर्ण जबाबदारी घेतो - पंतप्रधान

27 ऑगस्टकोळसा खाणवाटप घोटाळ्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मनमोहन सिंग यावर निवेदन देत होते, पण संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपनं त्यांना बोलूच दिलं नाही. नंतर सभागृबाहेर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांनी कोळसा खाणवाटपाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगितलं. माझं मौन म्हणजे माझा कमकुवतपणा नव्हे, तर हीच माझी प्रतिक्रिया आहे. कोळसा खाण वाटपाचा कॅगचा रिपोर्ट वादग्रस्त आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले. भाजपने मात्र पंतप्रधानांवर तोफ डागली. पंतप्रधानांचं निवेदन भाजपनं फेटाळलंय. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे भाजपनं म्हटलं आहे. दरम्यान, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलंय. तोडगा काढण्यासाठी लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. पण भाजपने त्यावर बहिष्कार टाकला. पण एनडीएचा सहकारी पक्ष संयुक्त जनता दलाचे नेते मात्र बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवेदनावर थोडक्यात चर्चा करण्याचा निर्णय यात घेण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 09:35 AM IST

खाण वाटपाची पूर्ण जबाबदारी घेतो - पंतप्रधान

27 ऑगस्ट

कोळसा खाणवाटप घोटाळ्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मनमोहन सिंग यावर निवेदन देत होते, पण संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपनं त्यांना बोलूच दिलं नाही. नंतर सभागृबाहेर पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांनी कोळसा खाणवाटपाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगितलं. माझं मौन म्हणजे माझा कमकुवतपणा नव्हे, तर हीच माझी प्रतिक्रिया आहे. कोळसा खाण वाटपाचा कॅगचा रिपोर्ट वादग्रस्त आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले. भाजपने मात्र पंतप्रधानांवर तोफ डागली. पंतप्रधानांचं निवेदन भाजपनं फेटाळलंय. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे भाजपनं म्हटलं आहे. दरम्यान, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलंय. तोडगा काढण्यासाठी लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. पण भाजपने त्यावर बहिष्कार टाकला. पण एनडीएचा सहकारी पक्ष संयुक्त जनता दलाचे नेते मात्र बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवेदनावर थोडक्यात चर्चा करण्याचा निर्णय यात घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close