S M L

हेल्मेट सक्तीविरोधात काढली हेल्मेटची प्रेतयात्रा

27 ऑगस्टपुण्यातल्या कॅम्प भागामध्ये येत्या 1 सप्टेंबर पासुन हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे आज एक अनोखा मोर्चा काढण्यात आला. चक्क हेल्मेटची प्रेतयात्रा काढून शिवसेनेनं आपला विरोध दर्शवला आहे. हा मोर्चा कॅम्प मधल्या भोपळे चौकातून कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कार्यालयापर्यंत नेण्यात आला. पुण्यातल्या सदर्न कमांड हेडक्वॉर्टरच्या सुचनेनुसार कॅम्प परिसरात येणार्‍या नागरिकांना हेल्मेटची सक्ती करण्याचा निर्णय कॅन्टॉनमेंट बोर्डाने घेतला होता. पण ही सक्ती गैरसोयीची आहे. हेल्मेट वापरल्याने मणक्याला त्रास होतो हे सिद्ध झालं आहे. म्हणून शिवसेनेनं हा अनोखा मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 04:50 PM IST

हेल्मेट सक्तीविरोधात काढली हेल्मेटची प्रेतयात्रा

27 ऑगस्ट

पुण्यातल्या कॅम्प भागामध्ये येत्या 1 सप्टेंबर पासुन हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे आज एक अनोखा मोर्चा काढण्यात आला. चक्क हेल्मेटची प्रेतयात्रा काढून शिवसेनेनं आपला विरोध दर्शवला आहे. हा मोर्चा कॅम्प मधल्या भोपळे चौकातून कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कार्यालयापर्यंत नेण्यात आला. पुण्यातल्या सदर्न कमांड हेडक्वॉर्टरच्या सुचनेनुसार कॅम्प परिसरात येणार्‍या नागरिकांना हेल्मेटची सक्ती करण्याचा निर्णय कॅन्टॉनमेंट बोर्डाने घेतला होता. पण ही सक्ती गैरसोयीची आहे. हेल्मेट वापरल्याने मणक्याला त्रास होतो हे सिद्ध झालं आहे. म्हणून शिवसेनेनं हा अनोखा मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close