S M L

केजरीवाल यांच्या पार्टीत जाणार नाही - बेदी

28 ऑगस्टजनआंदोलनानंतर टीम अण्णा आता विखुरली आहे.केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर वेगळ्यामार्गावर टीम भरकटत चालली आहे. केजरीवाल आणि माझे दृष्टीकोन वेगळे आहे. मी त्यांच्या पार्टीत जाणार नाही असा स्पष्ट खुलासा किरण बेदी यांनी केला. तसेच लोकपाल विधेयकासाठी मी अण्णासोबत लढा देत राहणार आहे. अण्णांनी भरकटलेल्या सगळ्यांना जोडावं असं आव्हानही बेदी यांनी केली. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य सहकारी सहकारी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले आहे. भाजप नाही तर सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्याची गरज आहे. यापुढेही सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्यात येणार असेल तरच आंदोलनात सहभागी होऊ असं बेदी यांनी काल स्पष्ट केलं होतं. सत्ताधारी पक्ष कायदे बनवू शकतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं पाहिजे. प्रत्येकालाच विरोध केला तर तुमच्याबरोबर कोण येणार, असा सवालही बेदी यांनी विचारला होता. केजरीवाल आणि बेदी यांच्यात या अगोदरही मतभेद झाले होते. पण रविवारी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इंडिया अगेन्सट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा निषेध म्हणून रॅली काढली होती या रॅलीत मात्र किरण बेदी सहभागी झालेल्या नव्हत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2012 09:43 AM IST

केजरीवाल यांच्या पार्टीत जाणार नाही - बेदी

28 ऑगस्ट

जनआंदोलनानंतर टीम अण्णा आता विखुरली आहे.केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर वेगळ्यामार्गावर टीम भरकटत चालली आहे. केजरीवाल आणि माझे दृष्टीकोन वेगळे आहे. मी त्यांच्या पार्टीत जाणार नाही असा स्पष्ट खुलासा किरण बेदी यांनी केला. तसेच लोकपाल विधेयकासाठी मी अण्णासोबत लढा देत राहणार आहे. अण्णांनी भरकटलेल्या सगळ्यांना जोडावं असं आव्हानही बेदी यांनी केली.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य सहकारी सहकारी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले आहे. भाजप नाही तर सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य करण्याची गरज आहे. यापुढेही सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्यात येणार असेल तरच आंदोलनात सहभागी होऊ असं बेदी यांनी काल स्पष्ट केलं होतं. सत्ताधारी पक्ष कायदे बनवू शकतात. त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं पाहिजे. प्रत्येकालाच विरोध केला तर तुमच्याबरोबर कोण येणार, असा सवालही बेदी यांनी विचारला होता. केजरीवाल आणि बेदी यांच्यात या अगोदरही मतभेद झाले होते. पण रविवारी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इंडिया अगेन्सट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा निषेध म्हणून रॅली काढली होती या रॅलीत मात्र किरण बेदी सहभागी झालेल्या नव्हत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close