S M L

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

27 ऑगस्टगेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईला चांगलेचं झोडपून काढले आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनीटं उशिराने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. तर रस्त्यावरही काही ठिकाणी पाणी साचल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. हिंदमाता, वडाळा यासारख्या सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय. गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात 65.6 मीमी पावसाची नोंद झालीये तर पुर्व उपनगरात 48.8 मीमी आणि पश्चिम उपनगरात 40 मीमी पाउस झाला आहे. तर पुढचे 24 तास अशाचं पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. महालक्ष्मी जक्शन,दादर पुर्व,सरदार नगर,सायन कोळीवाडा, हींदमाता, काळाचौकी या ठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र पंप मशिन्सच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्यात आला. मुंबई शहरात 4 ठिकाणी पुर्व उपनगरात 3 आणि पश्चिम उपनगरात 9 ठिकाणी अशी एकुण 16 ठिकाणी झाडं कोसळली आहेत.सध्या असलेला धरणसाठा मोडकसागर 87 टक्केतानसा 92 टक्केविहार 92 टक्के तुलसी 94 टक्के अप्पर वैतरणा 98 टक्के भातसा 73 टक्के मिडल वैतरणा 77 टक्के

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 10:32 AM IST

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

27 ऑगस्ट

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईला चांगलेचं झोडपून काढले आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनीटं उशिराने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. तर रस्त्यावरही काही ठिकाणी पाणी साचल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. हिंदमाता, वडाळा यासारख्या सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय. गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात 65.6 मीमी पावसाची नोंद झालीये तर पुर्व उपनगरात 48.8 मीमी आणि पश्चिम उपनगरात 40 मीमी पाउस झाला आहे. तर पुढचे 24 तास अशाचं पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. महालक्ष्मी जक्शन,दादर पुर्व,सरदार नगर,सायन कोळीवाडा, हींदमाता, काळाचौकी या ठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र पंप मशिन्सच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्यात आला. मुंबई शहरात 4 ठिकाणी पुर्व उपनगरात 3 आणि पश्चिम उपनगरात 9 ठिकाणी अशी एकुण 16 ठिकाणी झाडं कोसळली आहेत.

सध्या असलेला धरणसाठा

मोडकसागर 87 टक्केतानसा 92 टक्केविहार 92 टक्के तुलसी 94 टक्के अप्पर वैतरणा 98 टक्के भातसा 73 टक्के मिडल वैतरणा 77 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close